Kadamba Bus Reserved Seats
मडगाव: कदंब बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सीट राखीव न ठेवल्याची बातमी ‘दै. गोमन्तक’वर प्रसिद्ध झाल्यानंतर कदंब महामंडळाने त्याची त्वरित दखल घेत आपल्या सर्व बसमध्ये राखीव सीटची माहिती प्रदर्शित करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी पेंटरही नियुक्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या गोवा कॅनने यासंबंधी दिव्यांग आयोगासह इतर अधिकारिणीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याचप्रमाणे कदंब बस महामंडळाने आपल्या सर्व बसेसचे ऑडिट करुन तेथे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी सीट्स राखीव ठेवल्या आहेत की नाही याची शहानिशा करावी, अशी मागणी केली आहे.
मडगावहून कारवार येथे जाणाऱ्या (जीए०३ एक्स ०५५३) कदंब बसमध्ये राखीव सीट्स ठेवण्यात आल्या नसल्याचा प्रकार गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘गोमन्तक’च्या माध्यमांतून या घटनेवर उजेड टाकला होता.
या बसमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी जो व्हॉट्सॲप नंबर लिहिला जातो तोही नसल्याचे लक्षात आणून दिले होते. शनिवारी (ता.१५) ‘गोमन्तक’वर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. यासंंबंधी आम्ही दिव्यांग आयोगासह समाजकल्याण खाते, महिला आणि बालकल्याण खाते आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या सहाय्यक संचालकाकडे तक्रार दिली आहे, अशी माहिती मार्टिन्स यांनी दिली.
कदंब महामंडळाने मार्टिन्स यांना लिहिलेल्या उत्तरात कदंब बसमध्ये राखीव सीट्से पट्टे रंगविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच ज्या बसवर तक्रारीचा क्रमांक असलेले स्टीकर नाहीत त्या बसेसवर ते स्टिकर लावण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ही तक्रार संबंधित डेपोकडे चौकशीसाठी पाठविण्यात आली आहे, असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.