Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : कदंबच्या ताफ्‍यात नव्या 45 इलेक्ट्रिक बसेस दाखल : संजय घाटे

Margao News : स्मार्ट सिटी’अंतर्गत लाभ; आज आणखी तीन बसगाड्या

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव, स्मार्ट सिटी योजनेखाली कदंब महामंडळाला मिळायच्या असलेल्या ४५ विजेवर चालणाऱ्या बसगाड्या यापूर्वीच महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या असून आणखी तीन बसगाड्या उद्या मंगळवारी गोव्यात दाखल होणार आहेत.

कदंब वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या नागरी वाहतूक खात्यातून या बसगाड्या मिळाल्या असून त्यांचा वापर पणजी शहरापुरताच केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

स्मार्ट सिटी योजनेखाली राजधानी पणजी शहराला केंद्राकडून एकूण ४८ विजेवर चालणाऱ्या बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. त्यातील ४५ बसगाड्या गोव्यात आतापर्यंत दाखल झाल्या आहेत.

दिल्लीतून गोव्याला येण्यासाठी आणखी तीन बसगाड्या काल रवाना झाल्या होत्या. उद्या मंगळवारी त्या पणजीला पोहोचतील अशी आशा आहे, असे घाटे यांनी सांगितले.

कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांना यासंदर्भात विचारले असता, या अत्याधुनिक बसगाड्यांमुळे गोव्यातील वाहतुकीला नवीन ग्लॅमर प्राप्त होणार असून पर्यटकांसाठी ते एक आकर्षणही ठरू शकते, असे तुयेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT