Sarfaraz Alam Film Dainik Gomantak
गोवा

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

Kabir Sir Ka Aakhri Lesson: एक काळ असा होता, जेव्हा शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: एक काळ असा होता, जेव्हा शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या. मात्र, आज वेगाने बदलणाऱ्या शिक्षण पद्धती आणि वर्गातील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना या ज्येष्ठ शिक्षकांची मोठी तारांबळ उडत आहे. हीच भावनिक आणि सामाजिक व्यथा दिग्दर्शक सर्फराज आलम यांच्या ‘कबीर सर का आखरी लेसन’ या पहिल्याच हिंदी चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला असून, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक स्पर्धेसाठीही या चित्रपटाची निवड झाली आहे. गोव्यात पत्र सूचना कार्यालयातर्फे (पीआयबी) आयोजित पत्रकार परिषदेत सर्फराज आलम यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागची प्रेरणा उलगडली. विवेक विश्वास यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.

चित्रपटाची कल्पना कशी सुचली याबाबत सांगताना आलम म्हणाले, दोन वर्षांपूर्वी मी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील माझ्या बालपणीच्या शाळेला भेट दिली होती. तिथे पारंपरिक फळ्यांची जागा आता ‘स्मार्ट बोर्ड’ने घेतली आहे आणि माझे जुने शिक्षक या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना संघर्ष करत असल्याचे मी पाहिले. त्यातूनच चित्रपटाची कल्पना सुचली.

बिहारमधील एका साध्या गावातील शाळेपासून ते रशियात वैद्यकीय शिक्षण आणि त्यानंतर न्यूयॉर्क फिल्म अकादमीत चित्रपट निर्मितीचे शिक्षण, असा प्रवास त्यांनी मांडला. ज्या शिक्षकांनी डॉक्टर, अभियंते आणि आयएएस अधिकारी घडवले, त्यांनाच आज तंत्रज्ञानाचे अडथळे आणि बदलत्या दृष्टिकोनाचा सामना करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शिक्षक-विद्यार्थ्यांतील भावबंधांचा वेध

या हिंदी चित्रपटात अभिनेते विनय पाठक यांनी मुख्य भूमिका साकारली असून, त्यांच्या अभिनयाचे आलम यांनी विशेष कौतुक केले. आधुनिक शिक्षणपद्धतीत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमधील भावनिक नाते हरवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बिहारची प्रगती जगासमोर आणण्यासाठी सिनेमा प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, शिक्षकांचा आदर आणि पिढ्यांमधील अंतर यांवरील हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांना भावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT