CRZ Goa Regulations Dainik Gomantak
गोवा

CRZ Goa: सीआरझेड उल्लंघनप्रश्‍नी 22 वर्षांनी जुवांवला न्याय

जुवांव यांचा गोवा समुद्रकिनारी क्षेत्र व्यवस्थापन एजन्सीविरोधात न्यायालयीन लढा

दैनिक गोमन्तक डिजिटल

CRZ Goa: गेली 22 वर्षे सीआरझेडचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गोवा समुद्रकिनारी क्षेत्र व्यवस्थापन एजन्सीविरोधात न्यायालयात लढा देत असलेल्या उतोर्डा येथील जुवांव परेरा याला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला.

सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निवाडा देताना स्पष्ट केले आहे, की जुवांव यांचे बांधकाम किनाऱ्याच्या भरती रेषेपासून 500 मीटरहून अधिक अंतरावर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्यामुळे गेली कित्येक वर्षे अशा प्रकरणी न्यायालयात खेपा मारणाऱ्यांनाही न्याय मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

जुवांव परेरा म्हणाले, की गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापनची हॉटेल लॉबीची मेहेरनजर असते व आम्हा सारख्या सामान्यांना न्यायालयात खेचले जाते. आपल्यासंदर्भात सीआरझेड बाबत अधिकाऱ्यांनी न्यायालयाला खरे अंतर न सांगताच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

गेल्या 5 वर्षांत एकूण 974 प्रकरणे नोेंद झाली होती. त्यातील 195 प्रकरणांचा निकाल लागला, तर 779 प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रकरणांतही संबंधितांना आता न्याय मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT