Jnanpith Award 2023: Damodar Mauzo Dainik Gomantak
गोवा

Jnanpith Award 2023: कोकणी लेखक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

गीतकार गुलजार, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत गौरव

Akshay Nirmale

Jnanpith Award 2023: कोकणी लेखक दामोदर मावजो यांना आज, शनिवारी 27 मे रोजी भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. राजभवनात हा सोहळा पार पडला.

गीतकार गुलजार आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत मावजो यांचा या सन्मानाने गौरव करण्यात आला. वाग्देवीची ब्राँझची मुर्ती, 11 लाख रूपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. यावेळी गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यासह भारतीय ज्ञानपीठाचे अद्यक्ष न्या. वीरेंद्र जैन उपस्थित होते.

(सविस्तर वृत्त देत आहोत...)

दरम्यान, दामोदर मावजो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे गोव्याचे दुसले लेखक आहेत. 2008 साली दिवंगत रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.

दामोदर मावजो यांचा जन्म 1 ऑगस्ट 1944 रोजी दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावात झाला. मावजो यांची सुमारे 25 पुस्तके कोकणी भाषेत आणि एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांच्या साहित्यकृतींचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

मावजो यांना यापुर्वी 1988 साली सर्जनशील फिक्शनसाठीचा कथा पुरस्कार, 1997 साली गोवा राज्य फिल्म महोत्सवात उत्कृष्ट संवाद लेखन पुरस्कार, कला अकादमी पुरस्कार, कोकणी भाषा मंडळ पुरस्कार मिळाला आहे.

2011-12 साली त्यांना केंद्रीय संस्कृती मंत्रालयाची फेलोशिप मिळाली. 2011 साली ‘त्सुनामी सायमन’ या कादंबरीसाठी त्यांना विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार मिळाला.

गोवा स्वातंत्र्यलढा, कोकणी भाषेचे संवर्धन आणि गोव्याचे पर्यावरण यासंबंधीच्या चळवळींमध्ये ते सक्रिय राहिले आहेत.

मावजो यांनी कथा, कादंबरी, लघु कथा, पटकथालेखन, स्तंभ लेखन, नाट्य लेखन, निबंध, समीक्षा अशा विविध प्रकारांत लिखाण केले आहे. सूड (1975) , कार्मेलीन (1981), सुनामी सायमन (2009), जीव दिवं काय च्या मारूं (2020) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

त्यांच्या कार्मेलीन कादंबरीला 1983 साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या कादंबरीचे हिंदी, मराठी, इंग्लिश, पंजाबी, सिंधी, तामिळ, ओरीया, मैथिली असा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

गांथन (1971), जागरणां (1975), रूमडफूल (1981), भुरगीं म्हगेली तीं (2001), समनमोगी (2014), तिश्टावणी (2020) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. These are my Children नावांने त्यांच्या इंग्रजी कथांचे पुस्तक आहे.

पोर्तुगीज राजवटीतून स्वतंत्र झाल्यानंतरच्या गोव्याच्या समाजजीवनातील बदल, चढ-उतार त्यांच्या लिखाणात दिसतात. गोमंतकीय माणसाच्या संघर्षाची संवेदनशील मांडणी त्यांच्या लिखाणात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT