Jit Arolkar MGP Dainik Gomantak
गोवा

मंत्रिपद कुणाला नको, जीत आरोलकर यांचं सूचक वक्तव्य

मांद्रेच्या विकासावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचं आश्वासन

आदित्य जोशी

मोरजी : मंत्रिपद कुणाला नको, सर्व 40 आमदारांना मंत्रिपद हवे आहे. आपल्याला मंत्रिपद मिळाले तर ते आपण आनंदाने स्वीकारु, परंतु मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांच्या सूचनांचे पालन करु, असं वक्तव्य मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केले आहे. स्थानिक पत्रकारांनी तुम्हाला मंत्रिपद मिळेल का, असे छेडले असता जीत आरोलकर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. आरोलकर यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

भंडारी समाज (Bhandari Community) समितीने आपल्याला मंत्रिपद मिळावे,अशी प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे. याविषयी आपल्याला माहिती आहे. परंतु मगोचे नेते सुदिन ढवळीकर जो निर्णय घेतील, तोच आम्हाला मान्य राहील, असे सांगून चाळीसही आमदार निवडून आलेले आहेत आणि त्या सर्वांना जर मंत्रिपदाची ऑफर दिली, तर कुणीही ती नाकारणार नाही,असा टोला आमदार आरोलकर यांनी हाणला.

तुम्हाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) किंवा भाजपने मंत्रिपदाची ऑफर दिली. आणि त्या बदल्यात तुम्हाला भाजप प्रवेशाची ऑफर दिली. तर ती तुम्ही स्वीकारणार का? यावर त्यांनी लगेच स्पष्ट केले,की आपण मांद्रे मतदारसंघावर पोट निवडणूक (Election) लादणार नाही, आणि ती निवडणूक जनतेलाही परवडणार नाही. जनतेने आमदार म्हणून पाच वर्षे निवडून दिले आहे, त्यामुळे मांद्रेच्या विकासावर आपण लक्ष केंद्रित करणार असेही आरोलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT