राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात मोठी वाढ

केंद्र सरकारनंतर गोवा सरकारचा कर्मचाऱ्यांना दिलासा, 1 जानेवारीपासूनची थकबाकीही मिळणार
Goa government announces increase in DA,
Goa government announces increase in DA, Dainik Gomantak

पणजी : केंद्र सरकारनंतर आता गोवा सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 34 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्य सरकारने यासंबंधी परिपत्रक काढून सर्व सरकारी कर्मचारी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे. (Goa government announces increase in DA News)

Goa government announces increase in DA,
दिगंबर कामत जाणार भाजपमध्ये? राजकीय वाटचालीसंदर्भात जोरदार चर्चा

गोव्यात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासून 34 टक्के 'डीए' म्हणजेच महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या पगारात जानेवारी पासूनची थकबाकी दिली जाणार आहे. केंद्र सरकारनेही नुकतीच सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. यानंतर विविध राज्यांनीही महागाई भत्ता वाढवला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) चा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मान्यता दिली होती. तसेच महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ या दोन्हींचा एकत्रित परिणाम वार्षिक रु. 9,544.50 कोटी असेल. याचा फायदा सुमारे 47.68 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना (pensioners) होणार आहे.

Goa government announces increase in DA,
बांधकाम मंत्र्यांचा गोवेकरांना अजब-गजब सल्ला

महाराष्ट्रातही केंद्र सरकार (Central Government) पाठोपाठ राज्य सरकारने निर्णय घेत राज्याच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना आता तीन टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार बदललेल्या निकषांनुसार महागाई भत्त्यात बदल करत तो वाढवत 28 टक्क्यांवरुन 31 टक्क्यांवर नेला आहे. ही तीन टक्के वाढ आहे. जी राज्य शासकीय कर्मचारी (State Government Employees), इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना लागू असेल. ही वाढ 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com