Jit Arolkar: मांद्रे मतदार संघातून मगोचा आमदार निवडून देण्यासाठी अनेक भाजपचे व इतर पक्षाचे कार्यकर्त्ये मगोत प्रवेश करत आहेत. जशी निवडणूक जवळ येते तसे अनेक पक्षाचे कार्यकर्त्ये पक्षात येत आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे प्रतिपादन मगोचे मांद्रे उमेदवार जीत आरोलकर (Jit Arolkar) यांनी तुये येथे भाजपाचे (BJP) काही समर्थकांना मगोत प्रवेश दिला, त्यावेळी ते स्थानिक पत्रकारांकडे बोलत होते.
जीत आरोलकर यांनी यावेळी प्रकाश नाईक, विजय चंद्रोजी, संतोष साळगावकर, विजय नाईक आदींना प्रवेश दिला. यावेळी मगोचे (MGP) मांद्रे उपाध्यक्ष उदय मांद्रेकर उपस्थित होते.
जीत आरोलकर म्हणाले की, मगोची ताकत वाढवण्यासाठी मतदार संघातील अनेक कार्यकर्त्ये मगोला पाठींबा देत आहे. सरकारने (Goa Government) 10 हजार नोकऱ्यांचे आमिष देवून युवकांना फसवले, तेच युवक आता सरकारच्या विरोधात मतदान करून आपल्या आवडीचे लोकप्रतिनिधी आणि लोकांचे सरकार मगो-तृणमूल युतीतून (MGP-TMC Alliance) निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला.
ज्या भाऊसाहेब बांडोद्कारांनी (Bhausaheb Bandodkar) स्थापन केलेल्या मगो पक्षाचे मांद्रे मतदार संघातून 9 वेळा आमदार निवडून दिले, आता परत एकदा वीस वर्षानंतर मगोचाच लोकप्रतिनिधी या मतदार संघातून विजयी होईल असा विश्वास जीत आरोलकर यांनी व्यक्त करून, भाऊसाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला मगोची साथ द्यावी लागेल असे सांगून जनहितासाठी मी सदैव केव्हाही कार्यरत राहीन अशी ग्वाही जीत आरोलकर यांनी दिली. यावेळी उदय मांद्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.