Goa Crime Theft  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: परप्रांतीय गुन्हेगारांचे मुक्कामपोस्ट गोवा; पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांचे वाभाडे काढणाऱ्या तीन घटना

Goa Theft: मडगावात वर्दळीमुळे टळला सराफी दुकानावरील दरोडा

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. मात्र अलीकडे ते गुन्हेगारांसाठी आश्रयाचे ठिकाण बनले आहे असे म्‍हटले तर ते वावगे ठरणार नाही. अनेक गुन्हेगारांना गोव्यातून पकडून घेऊन गेल्याची प्रकरणे नोंद आहेत. गुन्हेगार गोव्यात आश्रय घेतात तरी गोवा पोलिसांना माहीत नसते.

दरोड्यासाठी आलेले दरोडेखोर हात हलवत परतताना पोलिसांच्या हाती लागले अन् त्यांनी गोव्यात केलेला टेहळणीचा प्रकार उघडकीस आला. यावरून गोवा पोलिसांची गुप्तचर यंत्रणा किती कमकुवत बनली आहे हे स्पष्ट होते. तेथील वर्दळीमुळे हा दरोडा टळला.

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील दरोडेखोर गोव्यात आले व त्यांनी एखाद्या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्यासाठी नियोजनही केले. परंतु त्या दुकानाच्या बाहेर असलेली वर्दळ तसेच तेथे असलेल्या गजबजीमुळे त्यांना आपले ईप्सित साध्‍य करता आले नाही आणि खाली हात जाताना बसमध्ये पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते सापडले. त्यामुळे गोव्यात कोणीही गुन्हेगार येऊन काहीही करू शकतो हे या प्रकरणावरून उघड झाले आहे.

हे दरोडेखोर गुजरातहून गोव्यातून आले व त्यांनी गोव्यात सराफी दुकान लुटण्याचे नियोजन करण्यामागील हेतू काय याची माहिती पोलिस मिळवत आहेत. त्यामुळे गोव्यातील व्यापाऱ्यांना एखादा व्यवसाय करायचा असल्यास त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे महत्त्वाचे झाले आहे.

व्यापाऱ्यांना त्यांच्याच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्‍याचे आवाहन गोवा पोलिस प्रत्येक बैठकीवेळी करत असतात. पूर्वी कोणी त्याकडे लक्ष देत नव्हते, मात्र अलीकडे राज्यात घडणाऱ्या वाढत्‍या चोरीच्या घटनांमुळे प्रत्येकजण सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घेत आहे. त्‍यामुळे एखाद्या ठिकाणी चोरी झाली किंवा एखादी घटना घडली तर त्वरित हालचाल करून माहिती मिळू शकते.

काही महिन्यापूर्वी दोन वेगवेगळ्या सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये चोऱ्या झाल्या होत्या. चोरटे हे ग्राहक म्हणून या दुकानांत घुसले व दागिने पाहत असताना कर्मचाऱ्याला व्यस्त ठेवून दागिने चोरून पसार झाले होते.

सांतिनेझ येथील एका दुकानात आई व मुलीने ग्राहक बनून येऊन सोन्याच्या सोनसाखळ्या हातोहात लंपास केल्या होत्या, तर पणजीत एका सराफी दुकानातून डायमंडच्या बांगड्या तसेच सोनसाखळी चोरल्या होत्या. मात्र या प्रकरणी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे काही तासांतच संशयितांना गजाआड करण्‍यात पोलिसांना यश आले होते.

मडगावात ज्या सराफी दुकानाला दरोडेखोरांनी लक्ष्य केले होते, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे होते. चोरटे व दरोडेखोर यांचे लक्ष्य रोख रक्कम व दागिने हेच असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी येणाऱ्या ग्राहकांची छायाचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतील अशा पद्धतीने ते लावण्याची गरज आहे.

तीन दिवस केली टेहळणी

मडगावात पाचजणांची टोळी तीन दिवस टेहळणी करत होती. ज्या सोन्याच्या दुकानावर त्‍यांचा डोळा होता, ते शहरापासून बाहेर असले तरी तेथील इतर व्यापाऱ्यांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. रेल्वेस्थानक जवळ असल्याने मडगाव हे शहर सोयीस्कर ठरेल असे त्यांना वाटले. तीन दिवस त्यांनी त्या ठिकाणी तासन्‌तास राहून संधीची वाट पाहिली. मात्र संधी मिळाली नाही. हा दुकानदार आपले दुकान उशिरा उघडून संध्याकाळी काळोख होताच बंद करत होता.

दोघेजण अद्याप आहेत पसार; वारंवार बदलतात ठिकाण

मडगाव शहरात अनेक सराफी दुकाने आहेत, मात्र ती खूपच गजबजलेल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तेथे दरोडा घालणे शक्य नव्हते. साहजिकच या दरोडेखोरांनी शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी आपले टार्गेट निश्‍चित केले होते. मात्र पोलिसांनी त्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघेजण रामनगर पोलिसांच्या ताब्यात तर एकटा कुळे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांचे आणखी दोघे साथीदार दर दिवशी जागा बदलत आहेत. मात्र तेसुद्धा लवकरच सापळ्यात सापडतील असा पोलिसांना विश्‍वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT