फोंडा उपनगराध्यक्षपदी जया सावंत यांची निवड Dainik Gomantak
गोवा

फोंडा उपनगराध्यक्षपदी जया सावंत यांची निवड

वीरेंद्र ढवळीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर फोंडा नगरपालिकेने उपसभापतीसाठी मतदान घेतले.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा उपनगराध्यक्षपदी जया सावंत यांची निवड झाली आहे. आणि मगो गोवा फॉरवॉर्ड समर्थक जया सावंत यांना 9 तर प्रतिस्पर्धी भाजप समर्थक अर्चना नाईक डांगी यांना 6 मते पडली आहेत.

वीरेंद्र ढवळीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर फोंडा नगरपालिकेने ( PMC ) आज एका नवीन उपसभापतीसाठी मतदान घेतले. यामध्ये अर्चना डांगी आणि जया सावंत या नगरसेवक निवडणूकीच्या रिंगणात होत्या. ढवळीकर यांच्या विरोधात 15 सदस्यीय समितीच्या आठ नगरसेवकांनी 11 ऑक्टोबर रोजी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. तथापि, परिषदेने हा निर्णय पालिका प्रशासनाचे संचालक (डीएमए) गुरुदास पिलारणकर यांच्याकडे पाठवला होता.

पिलारणकर यांनी आपल्या आदेशात म्हटले होते की, "15 सदस्यीय परिषदेत केवळ सात नगरसेवक असल्याने या प्रस्तावाला बहुमत मिळू शकत नाही. या प्रस्तावावर मतदान करण्यासाठी आठही सदस्य विशेष सभेला उपस्थित राहणे आवश्यक होते." भाजप प्रणित फोंडा नागरी समितीने 21 ऑक्टोबर 2020 रोजी वीरेंद्र ढवळीकर यांना PMC उपसभापतीपद बहाल केले होते. दरम्यान सहा महिन्यांत खुर्ची सोडतील आणि इतर सहकार्‍यांना उपाध्यक्ष होण्याची संधी देतील असे तोंडी ठरले होते. मात्र, तब्बल एक वर्ष होवूनही त्यांनी खुर्ची रिकामी केली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला. आणि ही निवडणूक घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; हाऊस फूल इस्पितळ

Goa Bad Roads: 1400 कोटी खर्च, पण रस्त्यावर खड्डेच; 'बीजेपीचे बुराक' मोहिमेत पालेकरांची टीका; रस्त्यांवर बसून केले आंदोलन

Voter Adhikar Yatra: 'मतचोरीचे षड्‌यंत्र हाणून पाडू'! राहुल गांधींचा एल्गार; ‘व्होटर अधिकार यात्रे’चा बिहारमध्ये प्रारंभ

Goa Politics: '2027 च्या निवडणुकीपूर्वी आघाडीचे ठरवले जाईल', पाटकर यांचे मत; 'आतिषीं'च्या वक्तव्यावर व्यक्त होणे टाळले

Comunidade Land Bill: दुरुस्ती विधेयकाला 2 कोमुनिदादींचा पाठिंबा; चिकोळणा, चिखलीचा महसूल वाढ, लाभांशाचा दावा

SCROLL FOR NEXT