Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: जावेदचा मृतदेह 36 तास नदीच्या तळाशी

Goa Accident Death: मांडवी पूल अपघात : कारचालक त्रिपाठीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: जुन्या मांडवी पुलावरून गुरुवारी कारच्या ठोकरीमुळे नदीत पडलेल्या जावेद सडेकर (वय 38, नास्नोळा, बार्देश) याचा मृतदेह आज (ता. 24) सकाळी सापडला. अपघात झाल्याच्या ठिकाणाहून नजीकच तो मृतदेह सापडल्याने 36 तास तो नदीच्या तळाशीच होता, असे स्पष्ट झाले आहे.

काहींच्या म्हणण्यानुसार, कारच्या धडकेमुळे जखमी झालेल्या जावेद याने जखमी अवस्थेतच नदीच्या पृष्ठभागावर येत मदतीची याचना केली होती. त्यानंतर कोणी मदतीला धावून न आल्याने तो घाबरला असावा. नंतर तो खोल पाण्यात बुडाला.

त्यामुळे तो नदीच्या तळाशी रुतून राहिला असावा. त्यामुळे त्याचा मृतदेह तेथेच अडकून पडला असावा. जावेद याचा मृतदेह सापडल्याने अटकेत असलेला कारचालक अंकित त्रिपाठीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.

कारचालकाकडून मद्यपान

या प्रकरणातील रेन्ट अ कार चालक अंकित त्रिपाठी हा दारू पिऊन गाडी चालवत होता, असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले असून त्याला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जावेद हा मूळचा मडगाव येथील असून त्याचा म्हापशातील युवतीशी प्रेमविवाह झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

SCROLL FOR NEXT