Crime News Dainik Gomantak
गोवा

आरोपी पकडले खरे पण माझे पैसे कोण देणार? गोव्यात लुबाडणूक झालेल्या 'त्या' जपानी पर्यटकाचा प्रश्न

पोलिसांनी याप्रकरणी तिघा संशयितांना अटक देखील केली आहे.

Pramod Yadav

गोव्यात एका जपानी पर्यटकाला काही लोकांनी मिळून सुमारे 9 लाख 23 जार रूपयांना लुबाडल्याचे समोर आले.  डिसेंबरमध्ये घडलेल्या या घटनेबाबत संबंधित पर्यटकाने ट्विटवर पोस्टमधून त्याची कैफियत मांडली. फसवणूक करणाऱ्यांचे फोटोही संबंधित पर्यटकाने ट्विटरवरून शेअर केले होते. त्यानंतर जपानी नागरिकाने हणजूण पोलिसांत ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली होती.

अखेर दोन महिन्यानंतर याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी रॉनी, राजू व इतर दोन अज्ञात व्यक्ती अशा चार संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तिघा संशयितांना अटक देखील केली. दरम्यान, या जपानी पर्यटकाने एक प्रश्न उपस्थित केला आहे.

तातुस्की असे या जपानी पर्यटकाचे नाव असून त्याने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत एक प्रश्न उपस्थित केला आहे.

"मला माझे पैसे कसे परत मिळतील?

आरोपी तुरूंगात आहेत, पण ते माझे पैसे कसे परत करतील.

जर कोणाला माहिती असेल तर कृपया मला सांगा."

असे ट्विट तातुस्की यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, घटना घडल्याच्या दोन महिन्यानंतर रविवारी याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी रॉनी, राजू व इतर दोन अज्ञात व्यक्ती अशा चार संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला. दरम्यान गुन्हा नोंद दाखल होताच दोन दिवसांत तिघा संशयितांना अटक करण्यात आली. 

तात्सुकी यांना रोकड, फोन व इतर साहित्य असे एकूण सुमारे साडे नऊ लाखांना लुबाडले गेले होते. पोलिसांनी तत्परतेने या प्रकरणातील संशयितांना अटक केल्याने पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाला 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT