Elephant Dainik Gomnatak
गोवा

Independence Day : 21 वर्षांनंतर जानुमणीला मिळाला स्वातंत्र्याचा श्वास

प्राणीमित्रांचा लढ्याला यश; गोव्यातील ‘जानुमणी’ कर्नाटकमध्ये सुरक्षित दाखल

दैनिक गोमन्तक

Independence Day : सतरा वर्षांपासून फोंड्यातील स्पाईस गार्डनमध्ये बंदिस्त केलेल्या जानुमणीची अखेर सुटका केली गेली. तिची कर्नाटकातील एलिफंट रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवणूक केली आहे. त्यामुळे तिने चक्क 21 वर्षानंतर स्वातंत्र्याचा श्‍वास घेतला. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार 2018 मध्ये पीपल फॉर ॲनिमल आणि प्राणीमित्रांनी ‘जानुमणी’ हत्तीण संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने वनखात्याला आदेश देत संबंधित प्राण्यांची संपूर्ण माहिती मागवली होते. राज्यात अशा स्वरुपाची 12 हत्ती बेकायदेशीररित्या पाळल्याची माहिती समोर आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर हत्तींना पर्यटन कामकाजातून वगळण्यात आले. गोव्यात वनखात्याकडे अशा प्राण्यांसाठी स्वतंत्र जागा नाही, इतर कोणतीच विशेष तरतूद नसल्याने वन खात्याने अन्य राज्यांमध्ये अशा स्वरूपाच्या प्राणी संरक्षण केंद्रांची माहिती घेतल्यानंतर त्यांना कर्नाटकामधील एलिफंट रेस्क्यू सेंटरची माहिती मिळाली.

मात्र, तिथे असलेली चारही केंद्रे अशा प्राण्यांनी भरल्यामुळे जानुमनी सद्यस्थितीत त्याच स्पाइस गार्डनकडे होती. त्यानंतर नव्याने जनहित याचिका दाखल झाल्यावर उच्च न्यायालयाने 18 जुलै 2022 रोजी जानुमनीला वनविभागाच्या ताब्यात असलेल्या ॲनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते. अखेर राज्याचे मुख्य वन संरक्षक संतोषकुमार यांच्या मदतीने या जानुमनीची कर्नाटकामध्ये पाठवून करण्यात आली आहे. सलग १८ तासांच्या प्रवासानंतर जानुमनीला येथील केंद्रात मोकळे सोडण्यात आले. त्यामुळे तब्बल २१ वर्षानंतर जानुमनीने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला.

2005 पासून राज्यात बंदिस्त

आसामच्या जंगलामधून पकडून बिहारच्या सोनेपूर प्राणी यात्रेत विक्रीसाठी आलेल्या जानुमणीला 2005 मध्ये गोव्यातल्या स्पाइस गार्डनमध्ये आणण्यात आले. तेव्हापासून ती बंदिस्त होती. पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या या हत्तीणीकडून पर्यटकांना फिरवून आणणे, त्यांच्याकडून स्नान करून घेणे याशिवाय इतर कामे करून घेतली जायची.

भारतीय वन्य कायद्याप्रमाणे कोणत्याच वन्य प्राणी, पक्षांना बंदिस्त करता येत नाही. तरीही हे हत्ती अवैधरित्या बाळगले होते. यासाठीच आम्ही जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने न्याय देऊन सदर हत्तीणीला कर्नाटक वन विभागाच्या ॲनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये मोकळे सोडण्यात आले आहे, असं पीपल फॉर ॲनिमलचे अध्यक्ष नॉर्मा अल्वारीस यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT