Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: बोडगेश्वर मंदिरात भरला जनता दरबार; मंत्री निलेश काब्राल यांनी केले लोकांच्या तक्रारींचे निरसन

Akshay Nirmale

Goa Minister Nilesh Cabral: म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिर सभागृह येथे उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या जनता दरबारात सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) मंत्री निलेश काब्राल उपस्थित होते. त्यांनी लोकांशी संवाद साधत तक्रारींचे निरसन केले.

या जनता दरबाराच्या निमित्ताने लोकांना सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि इतर सरकारी प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी लोकांना उपलब्ध झाली. ज्यामुळे त्यांना त्यांच्या समस्या मांडता आल्या आणि समाजाला प्रभावित करणार्‍या विविध समस्यांचे निराकरण करण्यास मदत झाली.

मंत्री नीलेश काब्राल यांनी उपस्थितांनी मांडलेल्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सार्वजनिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनासाठी सरकारची वचनबद्धता या कार्यक्रमात दिसून आली.

यावेळी आमदार जोशुआ डीसुझा, केदार नाईक, मायकेल लोबो, डेलीलाह लोबो, अॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा, म्हापशाच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू_हागे, पर्यावरण संचालक स्नेहा गित्ते, उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT