Janaseva Urban Bank
Janaseva Urban Bank  Dainik Gomantak
गोवा

Janaseva Urban Society : ‘जनसेवा अर्बन’च्या २५ वर्षे सेवेचे कौतुक : प्रकाश वेळीप

गोमन्तक डिजिटल टीम

Janaseva Urban Society :

‘ वर्धापनदिन उत्साहात; ‘क्यूआर कोड’चे अनावरण सांगे, सहकार क्षेत्र देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रात सदोदित सहभाग घेणाऱ्या संस्थांचा गौरव आणि अभिनंदन होणे आवश्यक असून एखादी संस्था सुरू करणे सोपे असते; पण सातत्याने संस्था टिकवून ठेवणे हे कठीण असते.

अशा कठीण परिस्थितीत यशस्वी वाटचाल करीत जनसेवा अर्बन संस्था पंचवीस वर्षे पूर्ण करीत असल्याबद्दल अभिनंदनास पात्र ठरत असल्याचे प्रतिपादन प्रकाश वेळीप यांनी केले.

जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगे या संस्थेचा पंचविसावा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला असून सकाळी सत्यनारायण महापूजा आणि सायंकाळी संस्था उभी करण्यासाठी ज्या भागधारकांनी संस्थेला मदत केली अशा सुमारे १२८ मान्यवरांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रकाश शंकर वेळीप यांच्या हस्ते सायंकाळच्या सत्राचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून हेमंत कामत, माजी आमदार वासुदेव गावकर, संस्थेचे चेअरमन संतोष गावकर, व्हाईस चेअरमन रत्नाकर वेळीप, संचालक नानू बांडोळकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेने आपल्या नेटवीन सिस्टीम अँड सॉफ्टवेअर, नाशिक यांच्या क्युआर कोड (स्कॅनर)च्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

१२८ भागधारकांचा सन्मान:

यावेळी संस्था उभारणी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला अशा एकूण १२८ भागधारकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

त्यात प्रामुख्याने एकनाथ नाईक, सुधाकर गावकर, उत्तम गावकर, रत्नाकर गावकर, कमलाकर बांडोळकर, राजेंद्र गावकर, शंकर गावकर, सर्वांनंद शिरोडकर, फोक्रू गावकर, दामू बांडोळकर, दीनानाथ सामंत, धर्मा भंडारी, बाबली गावकर आदींचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today News Live: न्हयबाग पोरस्कडे येथे चारचाकी व मालवाहू ट्रक यांच्यात अपघात

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

Goa Police: किनारपट्टी पोलिसांच्या ताफ्यात ‘एचडीपीई’ बोटी

Mapusa Bus Stand: म्हापसा बसस्थानकात थाटले चहाचे दुकान! चेअरमनना पत्ताही नाही

SCROLL FOR NEXT