Janani Janmabhoomi koul in Goa  Dainik Gomantak
गोवा

जनमन उत्सवाला उत्तर गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

फातोर्डा गवळी वाड्यावर महिलांचा जनमन उत्सवात सहभाग

दैनिक गोमन्तक

म्हापसा- दै. ‘गोमन्तक’ने हाती घेतलेल्या ‘जनमन उत्सव’ या सर्वेक्षणाच्या अंतर्गत उत्तर गोव्यात (Goa) आतापर्यंत मांद्रे, पेडणे, मये, वाळपई व प्रियोळमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या उपक्रमाला तेथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाला गृहिणी तसेच विविध व्यवसाय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील महिलांनीही योगदान दिले. तसेच, ‘गोमन्तक’च्या सर्वेक्षकांनाही यथोचित सहकार्यही केले.

Janani Janmabhoomi

गेल्या दोन दिवसांत झालेल्या सर्वेक्षणावेळी मये मतदारसंघातील ब्राह्मणवाडा-पैरा येथील वाठारेश्वर स्वयंसाहाय्य गट, श्री सत्पुरुष कळंबादेवी स्वयंसाहाय्य गट व ताडवाडा-पैरा व ब्राह्मणवाडा-पैरा येथील अन्य महिलांनी सहकार्य केले. तसेच वाळपई मतदारसंघातील कुलस्वामिनी कृपा स्वयंसाहाय्य गटाच्या सदस्य व त्याच मतदारसंघातील मासोर्डे येथील श्री वनदेवता स्वयंसाहाय्य गटाच्या सदस्यांचेही सहकार्यही लाभले.

Janani Janmabhoomi

फातोर्डा गवळी वाड्यावर महिलांचा सहभाग

गोव्यात पाहिल्यांदाच महिलांच्या मनात कशा रितीचा गोवा घडवायचा आहे आणि गोव्याचे भविष्यात कसा विकास झाला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी दै. ‘गोमन्तक’ने ‘जनमन उत्सव’ हे सर्वेक्षण हाती घेतले आहे, त्याला सर्व थरातील महिलांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. काल (मंगळवारी) फातोर्डा येथील गवळी वाड्यावरील महिलांनी सर्वेक्षणकर्त्यांचे स्वागत केले.

आपले हातचे काम बाजूला ठेवत या महिलांनी वेळात वेळ काढून या सर्वेक्षणात भाग घेतला. ‘गोमन्तक’सारख्या वृत्तपत्राने हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. या सर्वेक्षणातून खऱ्या अर्थाने महिलांच्या आकांक्षा पूर्ण होण्यास वाव मिळेल, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

काल वास्को परिसरातही सतत चौथ्या दिवशी महिलांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन नोंदी केल्या. ‘सवेरा’ या महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षा आणि मुरगावच्या माजी नगराध्यक्ष तारा केरकर याही सर्वेक्षणात सामील झाल्या. महिलांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरच राज्याचा चांगल्याप्रकारे विकास होऊ शकतो असे मत व्यक्त करत त्यासाठी ‘गोमन्तक’ने हा जो उपक्रम हाती घेतला आहे तो खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

वास्को परिसरातील समाजसेविका नूतन अरविंद शिंदे आणि शलाका कांबळी यांच्यासह अनेक महिलांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन आपली मते नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT