Jambavali Dhyan Foundation Goshala 
गोवा

जांबावलीत भाडोत्री गुंडांनी पाडली गोशाळा, 300 गोवंश, लहान वासरे आणि आजारी गायी उघड्यावर; मंजुनाथ दुकळेंसह 159 जणांविरोधात गुन्हा

Jambavali Dhyan Foundation Goshala: जांबावली येथील ध्यान फाऊंडेशनची गोशाळा भाडोत्री गुंडांचा वापर करून मध्यरात्री जमीनदोस्त केल्याची तक्रार केपे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: जांबावली येथील ध्यान फाऊंडेशनची गोशाळा भाडोत्री गुंडांचा वापर करून मध्यरात्री जमीनदोस्त केल्याची तक्रार केपे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी जांबावली देवस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे आणि प्रवास नाईक यांच्यासह सुमारे १५० जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोशाळा पाडल्यामुळे तब्बल ३०० गोवंश, लहान वासरे आणि आजारी गायींना मुसळधार पावसात उघड्यावर सोडून देण्यात आले असून अनेक गायी जंगलात पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी केपेचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, दुकळे, नाईक आणि अन्य दोन संशयितांसह १५० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात देवस्थानचे अध्यक्ष दुकळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.

गोशाळा ही देवस्थान समितीच्या जागेत असून त्या जागेत आणखी एक प्रकल्प उभा करण्याचे ठरविल्यानंतर ध्यान फाऊंडेशनने ही जागा खाली करावी, यासाठी समितीकडून यापूर्वी प्रयत्न झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Urban Property Card: नागरिकांना मिळणार 'अर्बन प्रॉपर्टी कार्ड', ड्रोनद्वारे होणार मालमत्तांचे सर्वेक्षण; प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन

PMGKAY: 4 वर्षांत लाभार्थींची संख्‍या सुमारे 50 हजारांनी घटली! राज्‍यातील सुमारे 4.31 लाख लोक घेतायत योजनेचा लाभ

Accident Death: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार, एकाची प्रकृती गंभीर; कामावरून घरी परतताना घाला

निकाल लागला, पण पदवी अजूनही रखडली; महाविद्यालयांच्या चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, कला शाखेचे 2 हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार भाग्यवान! श्रीविष्णूंच्या विशेष कृपेने या 3 राशींना नोकरीत मोठे यश, धनलाभाचेही प्रबळ योग

SCROLL FOR NEXT