Ketan Bhatikar Dainik Gomantak
गोवा

New GCA Goa क्रिकेट स्टेडियम : धारगळची डिचोलीवर ‘मात’

आमसभेत ठराव : केतन भाटीकर गोवा क्रिकेट संघटनेतून बडतर्फ

दैनिक गोमन्तक डिजिटल

New GCA Goa Cricket Stadium: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) नियोजित क्रिकेट स्टेडियम कुठे होणार, याबाबत गेले काही दिवस उलटसुटल चर्चा होत होत्‍या. मागील विधानसभा सत्रातही याविषयी प्रश्न उपस्थित झाला होता.

मात्र रविवारी जीसीए आमसभेने हा प्रश्न निकालात काढला आणि धारगळ येथेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यावर शिक्कामोर्तब झाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती आता जीसीएचे सदस्य राजेश पाटणेकर, जीसीएचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर सारे जण मावळिंगे येथील जीसीएच्या मालकीच्या जागेत स्टेडियम व्हावे यासाठी अनुकूल होते.

‘संघटनेला बदनाम करणारे नकोत’

  • गोवा क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात वावरणारे, संघटनेला बदनाम करणारे डॉ. केतन भाटीकर यांना संघटनेत का ठेवता, अशी विचारणा क्लबांनी आमसभेत केली.

  • त्यानंतर त्यांना संघटनेच्या आजीव सदस्यपदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय आमसभेत बहुमताने झाल्याची माहिती जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी दिली.

  • भाटीकर यांच्या बडतर्फीचा कालावधी किती असेल हे ठरविण्यात येईल. जीसीए वैद्यकीय संचालकपदावरूनही भाटीकर हटविण्यात आल्याचे विपुल यांनी सांगितले.

  • या ठरावावर भाटीकर यांच्या बाजूने फक्त चार क्लब राहिले. २०१८ मधील जीसीएल स्पर्धेतील बक्षीस रक्कम भाटीकर यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी सूचना आमसभेत क्लबनी जीसीए व्यवस्थापकीय समितीला केली.

स्टेडियम धारगळमध्येच व्हावे, असे मत बहुतांश क्लबतर्फे व्यक्त केले. स्टेडियमची ही जागा दळणवळणाच्या दृष्टीने स्टेडियमसाठी उपयुक्त आहे, असे त्यांना वाटते. आमसभेने आम्हाला धारगळ स्टेडियमसाठी पुढे जाण्यास व लवकर काम सुरू करण्याचे बजावले आहे. त्याचवेळी डिचोलीकडे दुर्लक्ष होणार नाही.

- विपुल फडके, अध्यक्ष, जीसीए

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa News Live Updates: अवैध वास्तव्य प्रकरणी मांद्रे पोलिसांकडून युगांडाच्या नागरिकाला अटक

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

Goa: नोकरीचे आमिष देऊन आणले गोव्यात, केले लैंगिक शोषण; केनियाच्या पीडितेची सुटका; नुकसानभरपाई मंजूर

SCROLL FOR NEXT