<div class="paragraphs"><p>Govind Gaude&nbsp;</p></div>

Govind Gaude 

 

Dainik Gomantak 

गोवा

आदिवासी मुले शिक्षित होतील ही सरकारची जबाबदारी: गोविंद गावडे

दैनिक गोमन्तक

सासष्टी: आदिवासी समाजासाठी सरकारने 22 योजना कार्यान्वित केल्या आहेत व त्याचा लाभही या समाजातील लोक घेत आहेत. मुलांसाठी शिष्यवृत्ती व प्रशिक्षण वर्ग चालविण्याची योजना आपल्याला जास्त भावते. आर्थिक विवंचनेमुळे आदिवासी मुले अशिक्षित राहणार नाहीत याची जबाबदारी सरकारने (Government) घेतलेली आहे, असे कला व संस्कृती तसेत आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यानी राशोल, राय येथील कार्यक्रमात सांगितले.

राशोल (Rachol) पंचायत एक मोठे सभागृह बांधत आहे. त्याच्या पायाभरणी समारभास मंत्री गोविंद गावडे (Govind Gaude) प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. सरकारी आदिवासी (Tribal People) समाजाच्या विकासासाठी सर्व खबरदारी घेत आहेत तरी कुणाच्याही आणखी काही अपेक्षा असतील त्या जाणुन घेण्यास आपल्याला आनंद होईल असेही ते म्हणाले.

हे सभागृह लवकच बांधुन पुर्ण होईल. स्थानिकांनी या बांधकामावर (Construction) लक्ष ठेवुन आपल्याला हवा तसा बांधुन घ्यावा असे आवाहनही त्यानी या वेळी केले. सभागृह ही कुठल्याही गावाची गरज आहे. पुर्वी गावागावांनी मांड भरायचे याची आठवण त्यानी या प्रसंगी केली.

या कार्यक्रमाला राशोल चर्चचे रेव्ह. फा. इरेमितो रेबेलो, जीएसएसटीएफडीसीचे चेअरमन दुर्गादास गावडे, आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप, उपसरपंच लुईस ओलिवेरा हे मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT