सासष्टी : गोव्यात ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. सरकार एका बाजूने लोकांना स्वत:ची सुरक्षा घेण्याचे आवाहन करत आहे. मात्र दुसरीकडे सनबर्नसारख्या महोत्सवाला सरकार मान्यता देत आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला लोकांची झुंबड उडाली होती. कोणीही सरकारने कोव्हिडसाठी घालून दिलेली मार्गदर्शक नियम पाळत नसल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारने सनबर्न महोत्सव ताबडतोब बंद करावा, अशी मागणी माजी आमदार मिकी पाशेको यांनी केली आहे.
सनबर्नमध्ये (Sunburn Festival) लोक तोंडाला मास्क (Mask) बांधत नाहीत आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडालेला आहे. यात गर्दीत एक दोन कोरोनाबाधित सापडले तर याचा फैलाव परत एकदा गोव्यात पसरायला वेळ लागणार नाही, अशी भीतीही मिकी पाशेको यांनी व्यक्त केली आहे.
सनबर्न महोत्सवाला मान्यता नाही असे स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मग महोत्सवाला कोणी परवानगी दिली याचा सरकारने शोध घ्यावा व लोकांना सांगावे, असा सवालही मिकी पाशेको यांनी विचारला आहे.
जमीन रुपांतर प्रक्रिया बंद करा
जमीन रुपांतराचा प्रश्न न्यायालयात असल्याने तसेच सुचना व आक्षेप नोंदणीसाठी दोन महिन्याची मुदत दिल्याने सरकारने (Government) जमीन रुपांतर प्रक्रिया बंद करावी तसेच नगर नियोजन खात्याचे जमीन रुपांतर संबंधी 16ब कलम रद्द करावे अशी मागणी पाशेको यांनी केली.
सध्या जमीन रुपांतरासाठी सरकारकडे 3500 पेक्षा जास्त अर्ज पडून असून जमीन रुपांतरासाठी 1000 रुपये प्रति चौरस मीटर इतकी फी आकारली जात असल्याचे पाशेको यांनी सांगितले. हा सगळा गैरव्यवहार असल्याचा आरोपही पाशेकोंनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.