Goa Kidnap Case Dainik Gomantak
गोवा

Goa Kidnap Case: ‘त्या’ अपहृत मुलींपैकी एकीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट

Goa Kidnap Case: पुढील तपास सुरू : निर्जनस्थळी सापडल्या होत्या चार मुली

दैनिक गोमन्तक

Goa Kidnap Case: नुवे येथे निर्जनस्थळी सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलींपैकी एकीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. हे प्रकरण अत्यंत गुंतागुतीचे असल्याने मायणा-कुडतरी पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली आहे. सध्या तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या चार मुलींना पोलिसांनी शाेधून काढले होते. यातील तीन मुली अल्पवयीन असून, पोलिसांनी पाच संशयितांनाही अटक केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी देमेतियस फर्नांडिस (१८), काइमिक्स कुतिन्हो (१९), माविन कुतिन्हो (१८), नोवेल फर्नांडिस (१९) व अझिम अहमद (२१) या युवकांना अटक केली आहे. ‘त्या’ मुलींना या संशयितांनी नुवे येथील डोंगरावरील एका निर्जनस्थळी नेले होते.

मुलींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून, त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे.

शुक्रवारी (ता.२७) पोलिसांनी महिला पोलिस अधिकाऱ्यासमोर पीडित युवतीची जबानीही नोंदवून घेतली. त्यात पीडितेवर लैगिंक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपहरण म्हणून प्रकरण नोंद

अपहरण म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवले आहे. संशयितांविरोधात भादंसंच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मंगळवार, २४ रोजी या मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यासंबंधी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत यांनी त्या मुलींचा व संशयितांचा शोध लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

Beach Shack sealed: हणजूण किनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘कर्लिस बीच शॅक’ला टाळे! CRZ चे उल्लंघन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

Goa Nightclub Fire: 'क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला कर्मचारी जबाबदार'! लुथरा बंधूंनी झटकले हात; पोलिस तपासात असहकार्य

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT