Vianaar and Isprava Group income-tax-department Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांच्या विविध जागेवर पणजी IT विभागाचे छापे; गोवा, मुंबई, दिल्लीसह 31 ठिकाणी झाडाझडती

सध्या सुरू असलेल्या प्राथमिक तपासात ठोस निष्कर्ष यापूर्वीच प्राप्त झाले आहेत.

Pramod Yadav

Vianaar and Isprava Group: करचोरी आणि मोठ्या प्रमाणात लक्झरी व्हिला प्रकल्पांशी संबंधित अघोषित मालमत्ता प्रकरणी, पणजी येथील आयकर विभागाच्या तपास शाखेने दोन रिअल इस्टेट कंपन्यांच्या विविध जागेवर छापेमारी केली. तपास शाखेने 12 जून 2023 रोजी वायनार ग्रुप आणि इस्प्रावा ग्रुप (Vianaar and Isprava Group) या दोन आघाडीच्या लक्झरी रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या जागेवर छापे टाकत शोध आणि सर्वेक्षण ऑपरेशन केले.

गोवा, मुंबई, दिल्ली, नोएडा आणि अमृतसरसह प्रमुख शहरांमध्ये असलेल्या एकूण 31 ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत बंगळुरू, दिल्ली, मुंबई, गुडगाव आणि डेहराडून येथे तैनात आयकर विभागाचे पथक काल सकाळपासून छापे टाकत आहेत.

भारतातील विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या, वायनार ग्रुप आणि इस्प्रावा ग्रुप या दोन्ही कंपन्यांची रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वदूर उपस्थिती आहे. याव्यतिरिक्त, त्यांचा ग्रुप हॉस्पिटॅलिटी विभागात कार्यरत आहे. कंपनी भारतातच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियामध्ये अपार्टमेंट आणि व्हिला भाड्याने देते.

सध्या सुरू असलेल्या प्राथमिक तपासात ठोस निष्कर्ष यापूर्वीच प्राप्त झाले आहेत. झडतीदरम्यान, मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड आणि संशयास्पद कागदपत्रे समोर आली आहेत. यातून संभाव्य करचुकवेगिरी समोर येत आहे. असे आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT