FC Goa in ISL Football  Dainik Gomantak
गोवा

ISL Football: एफसी गोवा, केरळा ब्लास्टर्स यांच्यात चढाओढ; अग्रस्थानासाठी फातोर्ड्यात रविवारचा सामना निर्णायक

आठ सामन्यांत पाच विजय सद्यस्थितीत केरळा ब्लास्टर्स 17 गुणांसह अव्वल स्थानी

किशोर पेटकर

FC Goa in Indian Super League Football: केरळा ब्लास्टर्स व एफसी गोवा यांच्यात सध्या फक्त एका गुणाचा फरक असून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या दहाव्या मोसमात अग्रस्थानासाठी जोरदार चढाओढ आहे.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी (ता. 3) या मातब्बर संघांत होणारा सामना निर्णायक असेल.

सर्बियन इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सने आठ सामन्यांत पाच विजय नोंदविताना 17 गुण नोंदविले असून सध्या ते अव्वल स्थानी आहेत. एफसी गोवा संघ अपराजित आहे.

पाच विजय व एका बरोबरीसह 16 गुण नोंदवून स्पॅनिश मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सहा सामन्यांतून 16 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. रविवारी विजय मिळविणारा संघ पहिल्या क्रमांकावर येईल.

मागील लढतीत पिछाडीवरून केरळा ब्लास्टर्सने कोची येथे चेन्नईयीन एफसीला 3-3 असे गोलबरोबरीत रोखले होते, तर वर्चस्व राखूनही एफसी गोवाला जमशेदपूर एफसीविरुद्ध 1-0 या निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले होते.

घरच्या मैदानावर दबदबा

एफसी गोवा आतापर्यंत सहापैकी तीन सामने घरच्या मैदानावर खेळला असून तिन्ही लढतीत त्यांनी पूर्ण गुणांची कमाई केली.

पंजाबला 1-0, ओडिशाला 3-2, तर जमशेदपूरला 1-0 असे नमवून मार्केझ यांच्या संघाने फातोर्ड्यात ‘ऑल विन’ मालिका राखली आहे. अवे मैदानावर त्यांनी तीनपैकी दोन सामने जिंकले, तर एक बरोबरी नोंदविली.

दोन्ही संघांचे आक्रमण धारदार

एफसी गोवा, तसेच केरळा ब्लास्टर्सने यंदा स्पर्धेत धारदार आक्रमणाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले आहे. केरळच्या संघाने सर्वाधिक 13 गोल केले असून गोव्यातील संघाने 10 गोल नोंदविले आहेत, तसेच भक्कम बचाव राखताना 4 लढतीत क्लीन शीट राखली.

त्यांची गोलसरासरीही +7 अशी सरस आहे. साहजिकच रविवारचा सामना रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

‘‘केरळा ब्लास्टर्सविरुद्ध आम्हाला आव्हानांची जाणीव आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत आणि आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. त्यांचे प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोविच व माझे चांगले नाते आहेत. ते लढवय्या असून तीच वृत्ती आपल्या संघातील खेळाडूंत निर्माण करण्याइतर सक्षम आहेत. सामना खडतर असेल. आयएसएलमधील प्रत्येक सामना लढाईप्रमाणे आहे आणि आम्ही कठीण लढतीसाठी सज्ज आहोत.’’

- मानोलो मार्केझ, एफसी गोवाचे प्रशिक्षक

आकडेवारीत...

  • एकमेकांविरुद्ध 18 सामने, एफसी गोवा 10, तर केरळा ब्लास्टर्स 4 सामन्यांत विजयी, 4 बरोबरी

  • एफसी गोवाने यंदा 10 गोल केले असून 3 गोल स्वीकारले

  • केरळा ब्लास्टर्सने 13 गोल करताना 9 गोल स्वीकारले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

Firing Video: रक्ताचा खेळ! LIVE सामन्यात अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

Viral Video: गोव्यात 'फॅमिली पॅक' स्टंट! स्कुटीवरुन एक दोन नव्हे तर 5 जणांचा जीवघेणा प्रवास; गवंडाळी येथील थरारक व्हिडिओ व्हायरल

Dabolim Airport: लवकरच येणार दाबोळी विमानतळ बंदचा आदेश? खासदार फर्नांडिस यांनी उघड केलं गुपित; 'ती' गुप्त फाईल रोखण्याची केली मागणी VIDEO

SCROLL FOR NEXT