Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राज्य सरकारने घेतलेले कर्ज कायद्यानुसार आहे का? : युरी आलेमाव

Goa Politics: युरी आलेमाव म्हणाले, राज्यावर असलेल्या कर्जाबाबत सरकार देत असलेली आकडेवारी केंद्र सरकारच्या आकडेवारीशी जुळत नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: राज्य सरकारची वित्तीय तूट 31 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे राज्य सरकारने घेतलेले कर्ज वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीला अनुसरून आहे का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रश्नोत्तर तासाला केली.

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्जाची रक्कम आणि वित्तीय जबाबदारी या दोन्ही भिन्न बाबी असून केद्र सरकार वित्तीय जबाबदारीची आकडेवारी कर्जाची म्हणून देते, याबाबत त्यांना कळवले आहे असे नमूद केले.

युरी आलेमाव म्हणाले, राज्यावर असलेल्या कर्जाबाबत सरकार देत असलेली आकडेवारी केंद्र सरकारच्या आकडेवारीशी जुळत नाही. राज्य सकल उत्पदनाची आकडेवारीही अशीच जुळत नाही. त्यामुळे नेमकी आकडेवारी कोणाची खरी, हा प्रश्न पडतो.

वित्तीय तूट 31 टक्क्यांवर पोहोचल्यामुळे कॅगने ताशेरे मारले आहेत. केंद्र सरकार म्हणते कर्ज 25 हजार 328 कोटी रुपये आहे तर राज्य सरकार म्हणते 21 हजार 940 कोटी रुपये कर्ज आहे. नेमके काय खरे आहे?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देताना म्हणाले, 4 टक्के कामे काही कारणास्तव झालेली नाहीत. त्यांचा फेरविचारही सुरू केला आहे. सरकार मर्यादेतच कर्ज घेते. शक्य असूनही गेल्या वर्षी 400 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले नाही. सरकारची कर्जे व महामंडळाची कर्जे वेगळी. ती आकडेवारी वेगवेगळीच दाखवायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT