RG Manoj Parab|Goa Politics  Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: पोर्तुगिजांचा समान नागरी कायदाही मुख्यमंत्री बदलणार आहेत का?

मनोज परब यांचा सवाल ः कोणत्या खुणा मिटविणार ते स्पष्ट करावे

गोमन्तक डिजिटल टीम

Manoj Parab पोर्तुगिजांच्या खुणा मिटवून नवीन गोवा साकारायचा सरकारचा प्रयत्न असेल असा संकल्प गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवराज्याभिषेकदिनी बेतूल येथे व्यक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नेमक्या कुठल्या खुणा मिटवून टाकू पाहात आहेत हे त्यांनी प्रथम स्पष्ट करावे, असे आव्हान आरजी प्रमुख मनोज परब यांनी आज दिले.

बाणावली मतदारसंघात परब आणि त्यांचे सहकारी आले असता पत्रकारांनी त्यांना हा प्रश्र्न विचारल्यावर ते म्हणाले, की त्यांनी कोणत्या गोष्टी पुसून टाकणार ते स्पष्ट केले पाहिजे.

पोर्तुगिजांनी गोव्याला समान नागरी कायदा दिला आहे, कोमुनिदाद संहिता दिली आहे, गोव्यातील कित्येक महत्त्वाची वारसा स्थळे पोर्तुगिजांनी बांधलेली आहेत.

मुख्यमंत्री सावंत हे या सर्व गोष्टी मिटवून टाकतील का असा सवाल करून तसे जर असेल, तर या सर्व गोष्टी पुढील विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी स्पष्ट कराव्यात आणि पोर्तुगीज राष्ट्रांकडे पाण्यासाठी सार्वजानिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी जो सामंजस्य करार केला आहे तोही रद्द करावा असा उपहासात्मक सल्ला त्यांनी दिला.

मिशन 2024 हे आरजी पक्षाचे लक्ष्य असून आमचा पक्ष गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार असल्याचेही परब म्हणाले. बाणावली मतदारसंघात येण्याबद्दल ते म्हणाले, की आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाला भेट देत आहोत आणि गोवावासीयांना मदत करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: कुंकळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

SCROLL FOR NEXT