हळदोणे मतदारसंघात श्रेयवादावरुन वाद; फेरेरा-टिकलो यांच्यात जुंपली!

भूमिगत वीजवाहिन्यांच्या प्रस्तावावरून वाद
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

हळदोणे मतदारसंघातील भूमिगत वीजवाहिन्यांच्या प्रस्तावावरून आजी-माजी आमदारांत सध्या वाद निर्माण झाला आहे. भूमिगत वीज वाहिन्यांच्या श्रेयवादावरून विद्यमान आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा व माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्यामध्ये सध्या जुंपली आहे.

विकासकामांच्या मुद्यावरून माजी आमदार ग्लेन टिकलो हे लोकांची दिशाभूल करता आहेत. मात्र, प्रत्येकवेळी दिशाभूल करता येत नाही हे टिकलोंनी समजून घ्यावे, असा टोमणा आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी टिकलोंना लगावला. मी पाठविलेला प्रस्ताव हा नवीन होता यावर फेरेरा यांनी जोर दिला.

हळदोणेतील भूमिगत वीज वाहिनींच्या मुद्यावरून ग्लेन टिकलो यांनी केलेल्या आरोपांना फेरेरा यांनी प्रत्युत्तर दिले. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी म्हापशातील काँग्रेस कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विरेंद्र शिरोडकर, हळदोणचे सरपंच आश्विन डिसोझा, नौशाद चौधरी आदी उपस्थित होते.

सप्टेंबर २०२१ मध्ये टिकलो यांनी भूमिगत वीजवाहिनीसंदर्भात विधान केले होते. त्यात १२० कोटींसाठी भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती दिली होती.

मात्र, जानेवारी २०२२ मध्ये निवडणुकीपूर्वी त्यांनी मी १०० कोटींची विकासकामे केल्याचे विधान केले होते. याचाच अर्थ या भूमिगत वीजवाहिन्यांचे १२० कोटी रुपयांचे काम नामंजूर झाले, हेच यातून अधोरेखित होते, असे फेरेरा म्हणाले.

Mapusa News
Goa Congress on Mapusa: निष्क्रिय आमदारामुळे रखडला म्‍हापशाचा विकास

१३ जुलै २०२२ रोजी विधानसभेत मी लक्षवेधी सूचना मांडली व तेथे हळदोणेतील खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी हळदोणेसाठी भूमिगत वीजवाहिनी मंजूर करण्याचे आश्वासन मला दिले होते. त्यात १२० कोटी रुपयांचा उल्लेख नव्हता.

तसेच वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यास मी २०१७ ते २०२२ सालापर्यंत ११ केव्ही भूमिगत वाहिनींसाठी प्रस्ताव आल्यासंबंधी माहिती मागणारे पत्र दिले होते. त्यानुसार यासंदर्भात कोणत्याच प्रकारचा प्रस्ताव सादर झाला नसल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले होते.

Mapusa News
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा-पणजीतील पेट्रोल दरांत किरकोळ बदल; जाणून घ्या आजच्या किमती

मूळ प्रस्ताव होता तो ८२ कोटी रुपयांचा. त्यात हळदोणेतील काही भागांसोबत शेजारील गावांचा या प्रस्तावात समावेश होता, असा दावा फेरेरा यांनी केला.

दरम्यान, पुढील निवडणुकीवेळी टिकलो यांनी आपल्या कामांचा अहवाल सादर करावा. मी माझ्या कामांचा अहवाल सादर करतो. लोकांना काय तो निर्णय घेऊ देत, असे आव्हान फेरेरा यांनी टिकलो यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com