IRONMAN 70.3 Goa | Drishti  Dainik Gomantak
गोवा

IRONMAN 70.3: रविवारपासून गोव्यात रंगणार 'आयर्नमॅन'चा थरार! 50 जीवरक्षक, AI रोबोट्सच्या साहाय्याने दृष्टी ठेवणार 'नजर'

IRONMAN 70.3 Goa: आयर्नमॅन ७०.३ गोवा स्पर्धेदरम्यान सहभागींना सुरक्षित ठेवण्यासाठी दृष्टी ५० जीवरक्षक तैनात ठेवणार आहे. हे जीवरक्षक एआई रोबोट्स आणि प्रशिक्षित श्वान पथकासह सुसज्ज असतील.

गोमन्तक डिजिटल टीम

Drishti to Deploy 50 Lifeguards with AI and Dogs for Ironman Goa

पणजी: आयर्नमॅन ७०.३ गोवा स्पर्धेदरम्यान सहभागींना सुरक्षित ठेवण्यासाठी दृष्टी ५० जीवरक्षक तैनात ठेवणार आहे. हे जीवरक्षक एआई रोबोट्स आणि प्रशिक्षित श्वान पथकासह सुसज्ज असतील. रविवार, २७ रोजी, मिरामार समुद्रकिनाऱ्यावरून ही स्पर्धा सुरू होणार आहे.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी मिरामार तटावर १.९ किमी पोहण्याचे आव्हान पार करतील, या दरम्यान सहभागींची सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी आयर्नमॅन गोवा आयोजकांनी राज्य सरकार नियुक्त दृष्टी जीवरक्षक दलासह सामंजस्य करार केला आहे.

आयर्नमॅन ७०.३ गोवा ही एक कठीण सहनशक्ती शर्यत आहे, जी एकूण ११३ किमी लांब आहे. यात १.९ किमी पोहणे, ९० किमी बाईक राईड आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट आहे. यापूर्वी, या स्पर्धेने ५० हून अधिक देशांतील खेळाडूंना आकर्षित केले आहे.

"यंदाच्या आयर्नमॅन ७०.३ गोव्यात ५० जीवरक्षकांची टीम तैनात केली जाईल. या जीवरक्षकांच्या टीमला पाच जेट स्की, ३० सर्फ बोर्ड, व बचाव वाहने आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असलेल्या दोन मोटर बोट्सचे समर्थन केले जाईल. या सर्व सोईंसोबत दृष्टीच्या नवीनतम श्वान पथकातील दोन श्वानही जीवरक्षकांना मदत करतील, असे दृष्टी मरीनचे सीईओ नवीन अवस्थी यांनी कळवले.

आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज!

आपत्कालीन परिस्थितीसाठी चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी, दृष्टी मरीन दोन वैद्यकीय केंद्र उभारणार. या केंद्रांवर दोन बचाव वाहने आणि प्रशिक्षित कर्मचारी असतील, जे कुठल्याही परिस्थितीत वैद्यकीय मदत देण्यासाठी सज्ज असतील. तसेच, स्पर्धेवेळी सहभागींच्या सुरक्षेसाठी दृष्टी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणार. यात दृष्टीच्या औरस आणि ट्रायटन या एआय प्रणालींचा समावेश आहे. औरस हा सेल्फ-ड्रायव्हिंग रोबोट आहे, तर ट्रायटन ही रडारसारखी निरीक्षण प्रणाली आहे, ही अतिशय उपयुक्त प्रणाली आहे,अशी माहिती दृष्टी मरिनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

भारत आणि इतर देशांतील स्पर्धकांना आकर्षित करणाऱ्या या प्रसिद्ध ट्रायथलॉनमध्ये सलग चौथ्या वर्षी महत्त्वपूर्ण सुरक्षा साहाय्य प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो. आमचे जीवरक्षक कोणतीही स्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय, आमचे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) रोबोट्स, औरस आणि ट्रायटन, तसेच आमच्या श्वान पथकातील दोन विशेष प्रशिक्षित श्वान, संपूर्ण सुरक्षा सहाय्य देण्यासाठी मिरामार बीचवर असतील.
नवीन अवस्थी, सीईओ ‘दृष्टी’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

SCROLL FOR NEXT