Ironman 70.3 Goa, Panaji traffic changes, Goa road diversions Dainik Gomantak
गोवा

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Goa road diversions: मेरशी सर्कल ते नवीन झुआरी पुलापर्यंतचा (वेर्णा बाजू) डावीकडील मार्ग आणि दिवजा सर्कल ते मेरशी सर्कलपर्यंतचा डावीकडील मार्गन फक्त स्पर्धेसाठी वापरला जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजीत रविवार ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘आयर्नमन ७०.३ गोवा’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे पणजी, मिरामार आणि कुठ्ठाळी परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

मेरशी सर्कल ते नवीन झुआरी पुलापर्यंतचा (वेर्णा बाजू) डावीकडील मार्ग आणि दिवजा सर्कल ते मेरशी सर्कलपर्यंतचा डावीकडील मार्गन फक्त स्पर्धेसाठी वापरला जाणार आहे.रायबंदर - पाटो ते दिवजा सर्कल दरम्यानचा रस्ता, डी. बी. मार्ग, दिवजा सर्कल ते मिरामार सर्कल दरम्यानचा नदीकिनारी मार्ग (उजव्या बाजूची लेन), डॉ. जॅक सिक्वेरा मार्ग :

मिरामार सर्कल ते एनआयओ सर्कल दरम्यानची मिरामार उजव्या बाजूचा मार्ग आणि एनआयओ सर्कल ते राजभवनकडे जाणारी उजवीकडील लेन स्पर्धा संपेपपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पणजी ते मडगाव दिशेकडील लेनमध्ये बदल करण्यात आला आहे.

नवीन उड्डाणपुलाच्या सुरुवातीपासून (शरयू टोयोटा शोरूमजवळ) ते पुलाच्या शेवटपर्यंत (कुडतरी डाऊन रॅम्पजवळ) जाणारी एक लेन तात्पुरती बंद राहील. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मडगावहून पणजीकडे येणारी वाहने शरयू टोयोटा शोरूम ते सेंट्रन्ट स्लोप, कुठ्ठाळी क्रॉस, कुठ्ठाळी सर्कल, अप रॅम्प, कुठ्ठाळीमार्गे वळवली जातील.

प्रवाशांसाठी मार्ग

जुने गोवे ते पणजी : वाहने रायबंदर पाटो - चिंबेल जंक्शन - मेरशी जंक्शन - अटल सेतू - पणजी डाऊन रॅम्पमार्गे वळवली जातील.

पणजी ते रायबंदर : दिवजा सर्कल - केटीसी सर्कल - मळा - सांताक्रूझ - मेरशी - रायबंदर या मार्गे जाता येईल.दाबोळी विमानतळ किंवा मडगावकडे जाणारी वाहने : नवीन झुआरी पुलाच्या बॅरिकेड केलेल्या डावीकडील लेनमधून जाऊन कुडतरी डाऊन रॅम्पमधून बाहेर पडतील.

- डी. बी. मार्गावरील रहिवाशांसाठी : मिरामार रेसिडेन्सी गेट ते हॉटेल मेरियॉट लेनपर्यंत रहिवाशांसाठी एक विशेष लेन उपलब्ध असेल. वाहने मॅरियॉट लेनमधून प्रवेश करून कांपाल येथील स्टारबक्स कॅफे जंक्शनमधून बाहेर पडू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT