Varca Murder Case Dainik Gomantak
गोवा

वार्का खूनप्रकरणातील लोखंडी दांडा तपासणीसाठी फॉरेन्सिककडे

दंडुक्यावर कोलवा पोलिसांना रक्ताचे डाग सापडल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

मडगाव : वार्का येथे त्रिनिदाद मार्टिन या वृद्धाचा खून करण्यासाठी वापरलेला लोखंडी दांडा न्यायवैद्यक म्हणजेच फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. या दंडुक्यावर कोलवा पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत. (Varca Murder Case News Updates)

काही दिवसांपूर्वी वार्का येथील आपल्या राहत्या घरी मार्टिन या वृद्धाचा खून करण्यात आला होता. यानंतर संशयित म्हणून त्याची मुलगी जुबेल मार्टिन्स हिला कोलवा पोलिसांनी (Police) अटक केली होती. मयत त्रिनिदाद मार्टिन्स यांची संशयित मुलगी जुबेल मार्टिन्स हिला कोलवा पोलिसांनी सात दिवसासाठी रिमांडसाठी कोठडीत ठेवले आहे. तिने अजूनही खुनाची कबुली दिलेली नाही.

मयताच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या असल्याने या खुनात (Murder) दुसऱ्या कोणाचा तरी सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे वळविली होती. यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन मूळ कनार्टक येथील आणि सध्या वार्का येथे राहत असलेल्या आणखी एका संशयिताला अटक (Arrest) केली होती. तसेच आणखी सात जणांची जबानी घेतली होती. पुढील तपासासाठी कोलवा पोलिसांना फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेल्या लोखंडी दंडुक्याच्या अहवालाकडे लक्ष लागले असून या खून प्रकरणी आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT