Goa Tourism 2023 Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Tour Package: नव्या वर्षासाठी आयआरसीटीसीचे नवे गोवा पॅकेज, कमी किमतीत धम्माल सुविधा

IRCTC Goa Tour Package: गोवा केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही तेथील नैसर्गिक सौंदर्यांसाठीही प्रसिद्ध आहे.

Pramod Yadav

IRCTC Goa Tour Package: गोव्याची टूर हा भारतातील प्रत्येक मध्यमवर्गातील नागरिकांसाठी अतिशय खास क्षण मानला जातो.

गोवा केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही तेथील नैसर्गिक सौंदर्यांसाठीही प्रसिद्ध आहे. पर्यटकांनाही येथील संस्कृती आवडते. त्यामुळे वर्षभर येथे प्रवाशांची वर्दळ असते.

पण, डिसेंबर-जानेवारीमध्ये येथे पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढते. कारण गोव्याचे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन खूप खास असते. येथील नाईट लाईफ आणि बीच कल्चर तरुणांना आकर्षित करते.

गोव्याला भेट देणार्‍या बहुतांश लोकांना त्यांच्या खिशातील पैशाची चिंता असते. कारण विचारपूर्वक प्रवास केला नाही तर खर्च लाखो रुपयांवर जाऊ शकतो. IRCTC च्या ऑफरमध्ये तुम्ही स्वस्त गोवा ट्रिप पूर्ण करू शकता. या ऑफरची संपूर्ण माहिती जाणून घ्या...

गोवा ट्रिप 22 जानेवारीपासून सुरू होणार असून ती 5 रात्री आणि 6 दिवसांची आहे. गोव्यातील टूरचा योग्य प्रकारे आनंद घेण्यासाठी इतका वेळ आवश्यक आहे. IRCTC ने या नवीन वर्षाचे बोनान्झा इन गोवा (EGA013B) असे नाव दिले आहे.

IRCTC ने पॅकेजची किंमत सिंगल ते ग्रुप अशी विभागली आहे. एका व्यक्तीसाठी 47,210 रुपये, दोन व्यक्तींसाठी 36,690 रुपये, तिघांसाठी 36,070 रुपये तर, 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी 35,150 रुपये आणि 2 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी 34,530 रुपये मोजावे लागणार आहेत.

या पॅकेजनुसार, फ्लाइट गुवाहाटी ते गोव्याला जाईल आणि तुम्हाला इकॉनॉमी सीटवरुन प्रवास करता येईल.

पहिल्या दिवशी तुम्हाला गोव्यातील हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागेल. दुसऱ्या दिवशी नाश्ता दिला जाईल आणि नंतर उत्तर गोव्यातील पर्यटन स्थळे जसे की बागा, बीच, आग्वाद किल्ला ही स्थळे दाखवली जातील.

तिसऱ्या दिवशी, तुम्हाला दक्षिण गोव्याला भेट देण्याची संधी मिळेल ज्यामध्ये तुम्ही मंगेशी मंदिर, गोव्यातील अनेक चर्च आणि दोना पाऊलाला भेट देऊ शकाल. चौथ्या दिवशी तुम्ही दूधसागर धबधबा बघू शकाल आणि पाचव्या दिवशी तुम्हाला काही स्थळांना भेट देऊन परतीचा मार्ग ठरवावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

Robert Connolly At IFFI: 'भारतीय चित्रपटांतील विविधता वाखाणण्याजोगी..'; ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाने केले द्विराष्ट्रीय संबंधांवर महत्त्वपूर्ण भाष्य

Tribal Community Reservation Bill: अधिवेशनाच्या तोंडावर ‘धनगर गवळी’ समाजाची धडपड! राजकीय आरक्षणाच्या मागणीला जोर

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

SCROLL FOR NEXT