Goa Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City Project: स्मार्ट सिटीच्या कामामुळे ताड-माड देवस्थानाला धक्का? संजीत रॉड्रिग्ज यांनी दिले उत्तर

Panjim News: इमॅजिन पणजी स्मार्टसिटी प्राव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि एमडी संजीत रॉड्रिग्स यांनी माध्यमांच्या समोर येत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले

Akshata Chhatre

पणजी: आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक अमित पालेकर यांनी पणजीत सुरु असलेल्या कामावर प्रश्न उपस्थित केलाय. हा प्रकल्प अजून काही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही असं म्हणत याविरुद्ध आता आवाज उठवावा लागेल असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आणि यानंतर इमॅजिन पणजी स्मार्टसिटी प्राव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि एमडी संजीत रॉड्रिग्स यांनी माध्यमांच्या समोर येत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले.

झाडाला स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे नुकसान झाल्याचा दावा

संजीत रॉड्रिग्स यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजीत सुरू असलेल्या २५० मीटर सांडपाणी लाईन आणि मॅनहॉल बांधकामासंदर्भात काही चुकीचे अहवाल पसरवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने ताड-माड, सांतिनेज येथील मंदिराच्या रचनेला आणि वडाच्या झाडाला स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे नुकसान झाल्याचा दावा केला जातोय.

मंदिर किंवा झाडाला कोणतेही नुकसान नाही

सांतिनेज येथील मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि स्मार्टसिटीच्या कामामुळेजवळ असलेल्या झाडावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही सखोल शोरिंग (सपोर्ट) काम केले आहे आणि कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाय योजले आहेत, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.

गटाराच्या भिंतीसंबंधी वास्तव

उत्खननाच्या कामामुळे गटाराच्या भिंतीचा काही भाग सैल झाला आहे हे खरं मात्र काही जणांकडून पसरवल्या जाणाऱ्या अहवालानुसार तो कोसळलेला नाही. गटाराच्या भिंतींना संरक्षक भिंत समजू नये. विद्यमान गॅस लाईन सुरक्षित ठेवण्यासाठी काही भाग नियोजनपूर्वक तोडून शोरिंगचे काम करण्यात आले आहे, आणि त्यामुळे हा भाग कोसळला असा त्याचा अर्थ लावू नये असं रॉड्रिग्स म्हणालेत.

सांतिनेजमधील ही जागा तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्यामुळे IPSCDLला स्थानिकांनी सहकार्य करावे आणि आजूबाजूला सुरु असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये , कारण अशा चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरते आणि कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खचते असं संजीत रॉड्रिग्स म्हणालेत.
संजीत रॉड्रिग्स

बांधकाम पथकाकडून घटनास्थळी पाहणी केली गेली असून सार्वजनिक सुरक्षेसाठी आवश्यक मजबुतीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. १२ मीटर खोलपर्यंत खोदकाम करावे लागतेय आणि यामुळे जमीन बसलीये मात्र यावर योग्य उपाययोजना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाण्याच्या लाईनला झालेले नुकसान

जमीन बसल्याने पाण्याच्या पाइपलाइनमध्ये हलकीशी गळती होतेय, पाइपमध्ये असलेल्या दाबामुळे असं घडत असल्याचं त्यांनी सांगितलं.

या पाण्याच्या गळतीमुळे अधिक नुकसान होऊ नये म्हणून ही लाईन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ तीन सरकारी वसाहती आणि एका गॅरेजसाठी पाणीपुरवठा बंद केला गेलाय.

सांतिनेजमधील ताड-माड या परिसरात रात्री काम करणे सुरक्षित नसल्यामुळे संध्याकाळी ५.३० वाजता काम थांबते, परंतु याला काम सोडून दिले असे म्हणता येणार नाही. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू असून, अभियंत्यांचे विशेष पथक यावर लक्ष ठेवून आहे. तसेच, हे काम न्यायालयात प्रलंबित याचिकेचा भाग असल्यामुळे IPSCDL जबाबदारीने काम करत आहे.
संजीत रॉड्रिग्स

मात्र यात सांतिनेज भागाचा समावेश नाही. काही अहवाल चुकीचा दावा करतायत, तरीही स्थानिकांना त्रास होऊ नये म्हणून पर्यायी पाइपलाइनचे काम गुरुवार (दि. ६ मार्च) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी दिलेय.

Credits: Vinayak Samant (Bicholim)

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT