IPL Cricket Betting Dainik Gomantak
गोवा

IPL Cricket Betting: सांगोल्डातील हॉटेलवर पोलिसांचा छापा, तीन सट्टेबाजांना अटक; 1.20 लाखाचा मुद्देमाल जप्त

IPL Betting Racket Busted: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेट सामन्यांदरम्यान ऑनलाइन सट्टेबाजीचे नेटवर्क उघडकीस आणत साळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

साळगाव: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेट सामन्यांदरम्यान ऑनलाइन सट्टेबाजीचे नेटवर्क उघडकीस आणत साळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राज्यात वाढत्या सट्टेबाजांवर वचक बसवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, सांगोल्डा येथील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तीन सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत तीन सट्टेबाजांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणारे १ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगोल्डा परिसरातील एका व्हिलामध्ये आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावत असल्याची माहिती मिळताच साळगाव पोलिसांनी तत्काळ छापा टाकत ही कारवाई केली. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गोव्यात सट्टेबाजीच्या प्रमाणात वाढ

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सट्टेबाजीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी गोवा पोलीस सट्टेबाज टोळ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करत आहेत.

राज्यात आयपीएल सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT