IPL fan experience free Dainik Gomantak
गोवा

गोव्यात IPL ची धूम! BCCI ची खास भेट; चाहत्यांना मोफत मिळणार स्टेडियमचा अनुभव

IPL Fan Park Goa: यंदाच्या हंगामात असेच फॅन क्लब' देशभरातील ५० शहरांमध्ये चाहत्यांना 'स्टेडियम लाइक' अनुभव देणार आहेत

Akshata Chhatre

Free Live IPL Screening Goa: सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची धूम सुरु आहे. मुंबई,पंजाब आणि बंगळूरुमध्ये सध्या कप मिळवण्याची चुरस सुरु आहे. बीसीसीआयकडून याच पार्श्वभूमीवर गोव्यातील चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आलीये.

तुम्ही जर का क्रिकेटच चाहते असाल तर १ जून आणि ३ जून रोजी कुडचडे येथे फॅन क्लब आयोजित करण्यात आलाय. इथे चाहते मोफत खेळाचा आनंद घेऊ शकतात. यंदाच्या हंगामात असेच फॅन क्लब' देशभरातील ५० शहरांमध्ये चाहत्यांना 'स्टेडियम लाइक' अनुभव देणार आहेत. याच उपक्रमांतर्गत, दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे, कुडचडे-काकोडा नगरपालिकेसमोरील जी. सुदा मार्केटमध्ये पहिल्यांदाच भव्य 'फॅन पार्क' उभारण्यात येणार आहे. यामुळे गोव्यातील क्रिकेटप्रेमींना त्यांच्या आवडत्या खेळाचा थरार मोठ्या स्क्रीनवर अनुभवता येणार आहे.

या फॅन पार्कबद्दल माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बीसीसीआयचे अधिकारी सत्यपाल निकाडे, गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी केतन भाटीकर आणि कुडचडे जिमखानाचे माजी अध्यक्ष मनोहर नाईक उपस्थित होते.

त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व आणि कुडचडे येथे पहिल्यांदाच फॅन पार्क आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.

भव्य स्क्रीनवर लाईव्ह ॲक्शनचा थरार

या फॅन पार्कमध्ये चाहत्यांना थेट सामन्याचा थरार एका मोठ्या स्क्रीनवर अनुभवता येईल. स्टेडियममध्ये बसून सामना पाहिल्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. यामुळे क्रिकेटचे चाहते एकत्र येऊन आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकतील. हा उपक्रम क्रिकेटला घराघरात पोहोचवण्यासाठी आणि चाहत्यांना एक अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी मदत करेल. कुडचडेमध्ये पहिल्यांदाच असे भव्य आयोजन होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT