Enforcement Directorate  Dainik Gomantak
गोवा

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

ED Raid: फ्लॅटच्या नावाखाली गुंतवणूकदारांची 636 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप व्यावसायिकावर आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय.

Pramod Yadav

उत्तर प्रदेश मेरठमधील एका व्यावसायिकाच्या घर, फॅक्टरी, कोल्ड स्टोअर, आईस फॅक्टरी आणि कार्पेट फॅक्टरीवर मंगळवारी सकाळी एकाच वेळी छापा टाकण्यात आला. हे छापे अजूनही सुरूच आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने तपास करताना मेरठसह दिल्ली, नोएडा आणि गोव्यात एकाच वेळी छापे टाकले आहेत.

या व्यावसायिकाने त्याच्या सहयोगी कंपन्यांशी संगनमत करून 330 फ्लॅट्स बांधण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची 636 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मेरठमधील व्यावसायिक शारदा एक्सपोर्टचे मालक जितेंद्र गुप्ता आणि त्याची सहकारी कंपनी हसंदा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या दिल्ली, चंदीगड आणि गोव्यातील 11 ठिकाणी एकाच वेळी ईडीने छापे टाकले आहेत.

ईडीकडून कागदपत्रे, लॅपटॉप जप्त करण्यात येत असून अनेक बँक खात्यांची माहिती घेण्यात येत आहे. फ्लॅटच्या नावाखाली गुंतवणूकदारांची 636 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप व्यावसायिकावर आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाने त्याच्या उपकंपनी हसंदाच्या माध्यमातून मेरठ आणि नोएडामध्ये आलिशान फ्लॅट्स बांधण्यासाठी लोटस-300 नावाचा प्रकल्प सुरू केला होता.

त्याद्वारे 330 सदनिकांचे बांधकाम सुरू करण्यात आले. ते तयार करण्यासाठी व्यावसायिकाने गुंतवणूकदारांकडून 636 कोटी रुपये उभे केले होते. लोकांना फ्लॅट देण्याऐवजी कंपनीने प्रकल्पाची सात एकर जमीन दुसऱ्या बिल्डरला विकल्याचा आरोप आहे.

गुंतवणूकदारांनी कंपनी आणि संचालकांविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत गुन्हे दाखल केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

याच कारवाईच्या मालिकेतील भाग म्हणून ईडीने हा छापा टाकला आहे. ईडीचा दावा आहे की कार्यालयातून जप्त करण्यात आलेली बँक खाती आणि कागदपत्रांचे पुनरावलोकन केले जात आहे. अजूनही तपास सुरू आहे. त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.

सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. त्याच वेळी, या प्रकरणात नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT