Land Scam Dainik Gomantak
गोवा

Land Scam In Goa: गोव्यात भूखंड घोटाळा, जमीन विक्रीचे १६० व्यवहार SIT च्या रडारवर

राज्यातील जमीन हडपप्रकरणी तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) नोंदणी विभागाकडून वैयक्तिक, संघटना तसेच काही कंपन्या मिळून सुमारे 160 प्रकरणांची विक्री खतांची माहिती मागविली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील जमीन हडपप्रकरणी तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) नोंदणी विभागाकडून वैयक्तिक, संघटना तसेच काही कंपन्या मिळून सुमारे 160 प्रकरणांची विक्री खतांची माहिती मागविली आहे. यामध्ये पथकाने अटक केलेल्या काही संशयितांचा त्या प्रकरणांशी संबंध आहे, अशी माहिती वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

(Land Scam In Goa)

या पथकाकडे सुमारे दोनशेच्या आसपास जमीन हडपप्रकरणीच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातील सुमारे 30 तक्रारींचा तपास सुरू आहे. अजून एकाही प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. जमिनीच्या व्यवहारांचा संबंध मामलेदार व भू-नोंदणी खात्याशी असल्याने सविस्तर माहिती मिळेपर्यंत उशीर होत आहे. त्यासाठी या दस्तावेजची माहिती असलेले अधिकारी मदतकार्यासाठी आहेत.

मात्र, तपासावेळी येणारी नवीन माहिती व त्याचे पुन्हा दस्तावेज मिळविण्यात वेळ जात आहे. ही जमीन हडप प्रकरणाची साखळी बरीच मोठी आहे व या जमीन खरेदीच्या व्यवहारात अनेकजण गुंतलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयितांना वारंवार बोलावून त्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रकरणांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

धार्मिक संघटनांनाही विकल्या जमिनी

जमीन हडपप्रकरणी तपास करताना काही संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांनी बनावट दस्तावेजाद्वारे त्यातील काही जमिनी विकासक तसेच काही धार्मिक संघटनांनाही विकल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या जमिनीच्या विक्री खताची माहिती घेऊन झालेल्या व्यवहाराचा तपास केला जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT