Police Investigation  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Investigation : गोव्यात तपास यंत्रणांची छापेमारी; आतापर्यंत 22 बांगलादेशी ताब्यात

‘पीएफआय’विरोधी एल्गार; एनआयए, सीबीआय, एनसीबी, ईडीची संयुक्त कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime Investigation : दहशतवादी व देशविरोधी घटनांमधील सहभाग, मनी लाँड्रिंग अशा विविध कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सदस्यांना शोधण्यासाठी देशभर अनेक ठिकाणी छापेमारी करत 100 पेक्षा जास्त संशयितांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. याचाच भाग म्हणून गोव्‍यात आज वास्को, कुंकळ्‍ळी येथेही मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एनआयए, सीबीआय, जीएसटी, इन्कम टॅक्स, एनसीबी, ईडी आधी तपास यंत्रणांचे सदस्य या कारवाईत सहभागी होते. दरम्‍यान, राज्य सरकारच्या पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आतापर्यंत 22 बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे.

बुधवारी रात्रीपासूनच देशभरच्या या कारवायांसाठी गुप्तचर यंत्रणेला सतर्क करण्यात आले होते. सकाळीच संबंधित संशयितांच्या मुक्कामांवर या यंत्रणा पोहोचल्या. प्रामुख्याने देशातल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यातून शंभरपेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे.
शिवाय देशविरोधी कारवायांमधील त्यांचा सहभाग, अंमलीपदार्थ व्यवहारांमध्ये सहभाग, मनी लाँड्रिंग तसेच देशविरोधी घटनांमध्ये त्यांचा सहभाग तपासण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून वास्को शहरातील दोन ठिकाणी या यंत्रणेने छापेमारी केली आहे. कुंकळ्‍ळी येथेही ही छापेमारी झाल्याचे समजते. ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने करण्यात आली होती.

दरम्‍यान, या छापेमारीत केरळमधून सर्वाधिक 22, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून प्रत्येकी 20, आंध्रप्रदेशमधून 5, आसाममधून 9, दिल्ली येथून 3, मध्यप्रदेश येथून 4, पुद्दुचेरीमधून 3, तामिळनाडूतून 10, उत्तरप्रदेशातून 8 आणि राजस्थानमधून दोघांना ताब्यात घेण्‍यात आले आहे.

राज्यभरातून 22 बांगलादेशी ताब्यात

राज्य सरकारच्या पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आतापर्यंत 22 बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सर्व प्रकारचा तपशील मिळवण्यात येत असून खोट्या आधारकार्डाच्या आधारे हे लोक गोव्यात राहत होते, हे स्पष्ट झाले आहे. तर काहीजणांकडे कोणत्याच प्रकारची कागदपत्रे नाहीत, अशी माहिती एटीएस सूत्रांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

SCROLL FOR NEXT