Success Story : शिक्षक नसलेल्या शाळेला त्याने कवेत घेतलं; सांगेतील तरुणाची प्रेरणादायी कथा

शिक्षकाविना बंद पडणाऱ्या शाळेला सांगेतील अवघ्या 23 वर्षांच्या प्रेमानंद रेकडो या तरुणाने आपल्या पंखांत सामावून घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचं काम सुरु केलं आहे.
Premanand Rekdo | Goa School Education | Success Story
Premanand Rekdo | Goa School Education | Success StoryDainik Gomantak
Published on
Updated on

Goa School Education Success Story : गोव्यात सध्या शाळा विलिनिकरणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. सरकारच्या या निर्णयाला शिक्षण क्षेत्रासह सर्वच स्तरांमधून विरोध होताना दिसतोय. दुसरीकडे गोव्यात तरुणांना नोकऱ्या नसल्याचा आरोप करत विरोधक वातावरण तापवताना दिसताहेत. मात्र अशातच सांगेतील एका तरुणाने असं काही करुन दाखवलंय जे भल्याभल्यांना आरसा दाखवणारं आहे. शिक्षकाविना बंद पडणाऱ्या शाळेला सांगेतील अवघ्या 23 वर्षांच्या प्रेमानंद रेकडो या तरुणाने आपल्या पंखांत सामावून घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचं काम सुरु केलं आहे.

प्रेमानंद हा सुशिक्षित तरुण असून त्याने प्राथमिक शिक्षणाचं प्रशिक्षणही घेतलं आहे. त्याने प्राथमिक शिक्षण विषयात पदवीका प्राप्त केली असून बंद पडलेल्या शाळेला आपल्या कौशल्यांच्या माध्यमातून नवी उभारी दिली आहे. सांगे भागातील वालकिणी येथे असलेल्या सरकारी प्राथमिक शाळेत एकच शिक्षक कार्यरत होता. गेल्या महिन्यात हा शिक्षक निवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु झाल्या मात्र शिक्षकच नसल्याने शिकवणार कोण असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही पडला. शिक्षण विभागानेही हालचाली करत जवळच असलेल्या वाडे येथील एका शिक्षकाची या शाळेवर नियुक्ती केली. मात्र त्या शिक्षकाने या नियुक्तीला विरोध करत नव्या शाळेत रुजू होण्यास नकार दिला.

अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी एका शिक्षकाची नियुक्ती केल्याचं सांगितलं, तसंच त्याने रुजू होण्यास नकार दिल्याचंही मान्य केलं. मात्र कोणताही ठोस उपाय शिक्षण विभाग सुचवू शकलं नाही. ज्या शाळेतील शिक्षकाची वालकिणी गावात नियुक्ती होणार होती, त्या वाडे गावातील शाळेत 77 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत 4 शिक्षकही कार्यरत आहेत. शिक्षकाला विचारलं असता काहीतरी क्षुल्लक कारण देत त्याने नव्या शाळेत रुजू होण्यास नकार दिला, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र तेव्हाच आपल्या गावात निर्माण झालेली ही समस्या 23 वर्षांच्या प्रेमानंद रेकडोने ओळखली आणि काम सुरु केलं. अद्याप शिक्षण खात्याने त्याला कोणतीही परवानगी दिली नसली तरीही केवळ समाजाची सेवा करण्यासाठी आपण कोणत्याही मोबदल्याविना ज्ञानदानाचं काम हाती घेतल्याचं रेकडोचं म्हणणं आहे.

Premanand Rekdo | Goa School Education | Success Story
Artist in Goa : संतुरवादनात डॉक्टरेट मिळालेला एकमेवाद्वितीय गोमंतकीय कलाकार

मी जे कार्य सुरु केलंय त्याला शिक्षण खात्याने कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र शाळेचं व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक कमिटीने तरुणाच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत त्याला शिकवण्याच्या कामासाठी हिरवा कंदील दाखवलाय. शाळेच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणतानाच आपल्यालाही यातून बरंच काही शिकायला मिळत असल्याची भावना तरुणाने व्यक्त केली आहे. शिक्षक नसल्याने शाळा बंद पडणार होती, सोबतच विद्यार्थ्यांचीही शिक्षणासाठी होणारी फरपट तरुणाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे थांबली आहे. कोविड काळातही या तरुणाने अशाच प्रकारे मुलांना शिकवण्याचं काम करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावला होता.

रेकडो याने सांगेमधीलच एका अनुदानित शाळेत प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून काम केलं आहे आणि शिकवण्याचा अनुभवही मिळवला आहे. मी सध्या बेरोजगार असलो तरीही काही ठिकाणी शिक्षकाच्या पदासाठी मुलाखती दिल्या आहेत. माझ्या या सेवेमुळे मला ज्ञानदानाचं समाधान आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. सोबतच मला मुलांना शिकवण्याचा अनुभनही मिळतोय हेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे, अशी भावना रेकडोनं व्यक्त केली आहे. आता गरज आहे ती रेकडोच्या प्रयत्नांना सरकारी मदतीची जोड मिळण्याची, ज्यामुळे एका कौशल्यपूर्ण बेरोजगार तरुणाला रोजगार मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com