Goa Trinamool Congress
Goa Trinamool Congress Dainik Gomantak
गोवा

Panaji Municipal Corporation: पणजीतील ‘सोपो’ घोटाळ्याची चौकशी करा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Trinamool Congress गोवा तृणमूल काँग्रेस (जीटीसी) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पणजी पोलिस ठाण्यात सोपो वसुली घोटाळ्याची तक्रार दाखल केली आहे. पणजीतील सोपो वसुलीच्या या घोटाळ्याची पणजी पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी गोवा तृणमूल काँग्रेसने केली आहे.

शनिवारी सकाळी, गोवा तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्या नेतृत्वाखाली कथित सोपो संकलन घोटाळ्याबाबत पोलिस निरीक्षक निखिल पालयेकर यांना तक्रारीची प्रत दिली.

डिमेलो यांनी तक्रारी म्हटले आहे, की पणजी शहर महानगरपालिकेचे आयुक्त, क्लेन मदेरा यांनी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून सोपो संकलनात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप प्रसार माध्यमांसमोर केला आहे.

गोवा टीएमसीचे संयुक्त संयोजक मारियानो रॉड्रिग्स, एआयटीसीचे संतोष मांद्रेकर, गोवा टीएमसी आयटी समन्वयक तनोज अडवलपालकर, सिद्धेश्वर मिश्रा, गोवा टीएमसी अल्पसंख्याक विंग, समन्वयक सुलताना शेख आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

संबंधितांची चौकशी करा

माजी महापौर उदय मडकईकर यांनी पणजी मार्केटमधील विक्रेत्यांना पावत्या न देता सोपो वसूल केला जात असल्याचा व्हिडिओ पुरावा असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे या कारणास्तव गोवा तृणमूल काँग्रेस पक्षाने गोवा पोलिसांनी विद्यमान महापौर आणि गेल्या १५ वर्षांपासून सोपो संकलनासाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT