Siolim News: फाईव्ह पिलार चर्चस्थळी धर्मांतर नाहीच; न्यायालयाकडून 'तो' आदेश रद्दबातल

न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत ः पोलिस, सरकारकडून अधिकारांवर गदा!
Siolim News
Siolim NewsDainik Gomantak

Siolim News सडये-शिवोली येथील फाईव्ह पिलार चर्चमध्ये धार्मिक सभा घेण्यास उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी याचिकादार जुआन व डॉमनिक डिसोझा या जोडप्याला बंदी घातलेला आदेश याचिकादारांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वरील आदेश हा रद्दबातल ठरविला.

या आदेशातून आम्हाला न्याय मिळाला आहे. तसेच पोलिस व सरकारामुळे अकारण आमच्या नावाची बदनामी तसेच छळवणूक झाल्याचा आरोप जुआन व डॉमनिक डिसोझा यांनी केला.

या दाम्पत्याने संयुक्तरीत्या शनिवारी सडये येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेतून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले. यावेळी त्यांचे काही अनुयायी उपस्थित होते.

जुआन मास्करेन्स डिसोझा म्हणाल्या, मुळात फाईव्ह पिलार चर्चमधील धार्मिक सभा किंवा प्रार्थनामधून कुठल्या प्रकारचे धर्मांतरण होत नाही.

काही असंतुष्ट लोक, पोलिस व सरकारने आमच्या विरोधात खोटे व दिशाभूल करणारे अहवाल देत आम्हाला मूलभूत अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवले. परंतु न्यायालयाचा हा आदेश या सर्वांसाठी चपराक आहे.

सद्‍गुरू पार्सेकर, प्रदीप मडकईकर, अँथनी फर्नांडिस, रामा नाईक या काही अनुयायींनी आपले अनुभव सांगत आम्ही फाईव्ह पिलार चर्चचे आम्ही अनुयायी असल्याचे सांगितले. आणि इथे कुठलेही गैरप्रकार किंवा धर्मांतरण यासारखे गैरप्रकार चालत नसल्याचा दावा केला.

Siolim News
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील आजचे पेट्रोल - डिझेलचे दर जाहीर, टाकी फुल्ल करण्यापू्र्वी जाणून घ्या सविस्तर

दिशाभूल अहवाल...

जुआन म्हणाल्या, की पोलिस, असंतुष्ट लोक व सरकारने मिळून आमची छळवणूक केली. आम्ही प्रार्थनामधून लोकांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. चर्चस्थळी धर्मांतर तसेच अनधिकृत प्रकार चालत नाहीत.

यास्थळी सर्व जाती-धर्मातील लोक स्वखुशीने सहभागी होतात. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या खोट्या व दिशाभूल अहवालाच्या माध्यमातून चर्चस्थळी जमावबंदीचा आदेश लागू केला. त्याचप्रमाणे, आमच्यावर खोटे गुन्हे नोंद झाले होते.

त्यातील अनेक गुन्ह्यातून आमची निर्दोष सुटका झाली आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात न्यायालयासमोर सादर केले नव्हते. हे सत्य आम्ही न्यायालयाला पुराव्यानिशी सिद्ध केल्याचा दावा त्यांनी केला.

Siolim News
Goa Crime: पूर्ववैमनस्यातून युवकाचे अपहरण व मारहाण

गावात शांततेसाठी प्रयत्न

ज्याठिकाणी फाईव्ह पिलार चर्च आहे, तिथे अगोदर मी बार चालवत होतो. मी आध्यात्मिककडे वळल्यानंतर मी बारचा परवाना रद्द केला आणि तिथे प्रार्थना घेऊ लागलो. अनेकजण जे दारू, जुगार किंवा इतर गैरमार्गाकडे वळले होते, त्यांना आम्ही योग्य मार्गावर आणले.

जनकल्याण व समाजाचे भले व्हावे, यासाठीच मी नेहमी प्रयत्न केले. मी सडये-शिवोलीचा सुपुत्र असून गावात शांती नांदावी हीच आपली इच्छा असल्याचे डॉमनिक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com