Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: ड्रग्स विक्री प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबललाच अटक! 'ANC'ने पाळत ठेऊन केली कारवाई, 9 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Goa Drug Bust: बडतर्फ पोलिस करण गोवेकर याला ५ दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती ड्रग्सविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: ड्रग्सविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने वागातोर व हरमल येथे छापा टाकून एका बडतर्फ कॉन्स्टेबलसह दोन स्थानिकांना अटक करत त्यांच्याकडून १०.९८ लाखांचे ड्रग्स जप्त केले. संशयितांनी या ड्रग्सची विक्री करण्यासाठी वापरलेली वाहनेही जप्त केली आहेत. बडतर्फ पोलिस करण गोवेकर याला ५ दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती ड्रग्सविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हणजूण येथील बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल करण गोवेकर (वय २३ वर्षे) हा ड्रग्स विक्री प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एएनसी पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली होती. अत्याधुनिक यंत्रणांद्वारे त्याच्या हालचालींवरही नजर ठेवली होती.

तो शनिवारी रात्री वागातोर येथे ग्राहकाला ड्रग्स देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच या परिसरात सापळा रचण्यात आला. तो गाडीने येत असताना ओझरान येथे एएनसी पथकाने त्याला अडविले. त्याची तसेच गाडीची तपासणी केली असता त्याच्याकडे ३७ ग्रॅम कोकेन, ३७ ग्रॅम मेथाम्फेटामाईन व १५ उच्च दर्जाच्या एक्स्टसी टॅबलेट्स जप्त करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ८.९८ लाख रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

Ajit Pawar Plane Crash: आग, धूर अन् विमानाचे तुकडे...! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचे व्हिडिओ, फोटो समोर

SCROLL FOR NEXT