Assault Case Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

Drugs peddler surrenders: तीन दिवस पोलिसांना हुलकावणी देणारा ड्रग्स पेडलर तेहरान ऊर्फ टेरेन्स फर्नांडिस हा गुरुवारी अखेर फातोर्डा पोलिसांना शरण आला. मागाहून त्याला पोलिसांनी रीतसर अटक केली.

Sameer Panditrao

मडगाव: तीन दिवस पोलिसांना हुलकावणी देणारा ड्रग्स पेडलर तेहरान ऊर्फ टेरेन्स फर्नांडिस हा गुरुवारी अखेर फातोर्डा पोलिसांना शरण आला. मागाहून त्याला पोलिसांनी रीतसर अटक केली.

सोमवारी (ता. १५) फातोर्डा पोलिसांनी मोडसाय बड्डे येथे एका घरात सुरू असलेल्या ड्रग्स धंद्याचा फातोर्डा पोलिसांनी पर्दाफाश करताना १ लाख १० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. छाप्यावेळी तेहरान हा पोलिसांना चकवा देऊन याच घरातील अन्य एका दारातून पळून गेला होता. पोलिस त्याच्या मागावर होते.

संशयित आपल्या घरातून ड्रग्सचा पुरवठा करीत होता. पोलिस त्याच्या पाळतीवर होते. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर व पोलिस पथकान छापा टाकून १ लाख ५६०० रुपये व एक एअरगन, चार टॅब, तीन वजन माप यंत्रेही जप्त केली होती.

फोंड्यात मारहाण तिघांना अटक

गणेश टूडू नामक इसमाला जबर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना फोंडा पोलिसांनी अटक केली. त्यात अमय नाईक (मडकई), प्रितेश कामत (दाबोळी) व देवेंद्र शेळपकर (माशेल) या तीन संशयितांचा समावेश आहे. तिघाही संशयितांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

Viral Video: "मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?", काश्मिरी माणसानं पर्यटकाला दिलं झणझणीत उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकहितासाठी सरकार मागे हटण्यासही तयार! आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे- श्रीपाद नाईक

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT