International Yoga Day Dainik gomantak
गोवा

International Yoga Day 2023: विद्यार्थ्यांमध्‍ये वाढतेय नैराश्‍‍य; आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी योगाला द्या प्राधान्‍य : दामोदर गोवेकर

गोमन्तक डिजिटल टीम

संतोष कुबल

International Yoga Day 2023 : सध्‍याच्‍या धावपळीच्‍या आणि स्‍पर्धेच्‍या युगात मनुष्‍य आपले मानसिक स्‍वास्‍थ्‍य हरवून बसला आहे. वाईट आणि नकारात्‍मक विचार सतत त्‍याच्‍या डोक्‍यात घोंगावू लागले आहेत. परीक्षेत नापास होणारी मुले कोणताही विचार न करता आत्‍महत्‍या करून आपले जीवन संपवत आहेत. धीर आणि संयम कोणाकडे नावालाही राहिलेला नाही.

या पार्श्वभूमीवर योगाचे महत्त्‍व स्‍पष्‍ट होते. मुलांना लहानपणापासूनच योगाकडे वळविल्‍यास त्‍यांचे आरोग्‍य निरोगी तर होतेच, शिवाय त्‍यांची बौद्धिक क्षमता आणि स्‍मरणशक्ती वाढते. सर्व स्‍पर्धा, परीक्षांमध्‍ये ती उत्तीर्ण होतात.

पर्यायाने अनेक मुलांचे जीवन वाचते, असे दामोदर गोवेकर यांनी सांगितले. दुर्दैवाने आमच्‍या गोव्‍यात योगाचा प्रचार आणि प्रसार म्‍हणावा तसा झालेला नाही, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्त केली.

आठवड्यातून दोन दिवस तरी शाळेत मुलांना योगासने शिकविली पाहिजेत, जेणेकरून ती स्‍पर्धेच्‍या युगात टिकून राहतील. आपल्‍या गोव्‍यात याचा अभाव आहे. मुले मैदानी खेळांपासून दूर होत चालली आहेत. मोबाईल, टीव्‍ही आणि व्‍यसनांच्‍या विळख्‍यात ती सापडत चालली आहेत. त्‍यांना योगाकडे आकृष्‍ट करणे काळाची गरज आहे.

योगामुळे मुलांना कसे बोलावे, वागावे हे समजते. समोरच्‍या व्‍यक्तीला मानसन्मान देण्‍याचे भान त्‍याला येते. योगासने करणारा विद्यार्थी कधीही अयशस्‍वी होत नाही, आत्‍महत्‍या करत नाही, असे गोवेकर यांनी ठामपणे सांगितले.

आपल्‍या गोव्‍यात प्रशिक्षित योगगुरु नाहीत. त्‍यामुळे योगाचा दर्जा खालावत चालला आहे. कोणाला समजून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला तर त्‍याला राग येतो. त्‍यामुळे पहिल्‍यांदा योगगुरु बना व नंतरच मुलांना योगा शिकवा, असा सल्ला गोवेकर यांनी दिला.

चुकीच्‍या पद्धतीने योगासने शिकविली तर त्‍याचे आरोग्‍यावर वाईट आणि दूरगामी परिणाम होतात. म्‍हणूनच आम्‍हाला ‘सर्टिफाईड’ योगगुरु नकोत तर ‘क्वालिफाईड’ योगगुरु पाहिजेत.

कारण तेच योगाचे योग्‍य धडे देऊ शकतील असे सांगून आपल्‍या हेडलँड-वास्‍को येथील अकादमीत 35 मुलांसह एकूण 50 जण दररोज योगासने शिकायला येतात आणि त्‍याचे चांगले परिणाम त्‍यांना दिसू लागले आहेत. गुरुशिष्य परंपरेने हे कर्तव्‍य मी पार पडतो, त्‍यासाठी मोबदला स्‍वीकारत नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

तो’ माजी मंत्री योगाने बरा झालाय, पण…!

योगासने ही निरोगी आरोग्‍याची गुरुकिल्ली. कित्‍येक लोक योगासने करून दुर्धर आजारातून बरे झालेले आहेत. वास्‍तविक अशा लोकांनी आपले अनुभव सांगून योगाचा प्रसार केला पाहिजे. पण तसे होत नाही. गोव्‍यातील एका माजी मंत्र्याला पक्षाघाताचा झटका आला.

हातपाय, चेहरा, तोंड वाकडे झाले. चालता, फिरताही येईना. मी त्‍याला योगाचा सल्ला दिला आणि त्‍याच्‍याकडून योगासने करवूनही घेतली. आता तो मंत्री पूर्णत: बरा झालेला आहे. चालतो, फिरतो. परंतु खेदाची बाब म्‍हणजे त्‍यानेही योगामुळे आपल्‍याला झालेला फायदा दुसऱ्यांना सांगण्‍याचे कष्‍ट घेतले नाहीत.

सहाव्‍या वर्षी हृदयविकाराचा झटका

वयाच्‍या सहाव्‍या वर्षी मला हृदयविकाराचा झटका आला. रक्तदाबही वाढायला लागला. कोणीतरी योगासने करण्‍याचा सल्ला दिला. त्‍यानुसार योगा सुरू केला. रोगप्रतिकारशक्ती वाढली आणि काही महिन्‍यांतच या दोन्‍ही आजारांतून बरा झालो.

प्रशिक्षित योगशिक्षकाकडून योगासने शिकून घेतली तर कोणत्‍याही आजारावर मात करता येते, असे दामोदर गोवेकर यांनी सांगितले. हरिद्वार येथे जाऊन मी योगाचे धडे घेतले आणि आता गोव्‍यात ते इतरांना देत आहे. सध्‍याचे वाढते प्रदूषण पाहिले तर भविष्‍यात औषधांचा आपल्‍या आरोग्‍यावर कोणताही परिणाम होणार नाहीय. फक्त योगच माणसाला तारू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT