Goa Cruise Service: मुंबई, गोवा, कोची, लक्षद्वीप दरम्यान 'या' तारखेपासून लक्झरी क्रूझ सेवा; किती असणार तिकीट? जाणून घ्या सविस्तर

14 मजली क्रूझमध्ये पर्यटकांना मिळणार फाईव्ह स्टार सुविधा
Goa Cruise Service
Goa Cruise ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

Costa Cruise Service: देशात पर्यटकांसाठी लवकरच लक्झऱी क्रुझ सेवा सुरू होणार आहे. 4 नोव्हेंबरपासून मुंबई, गोवा, कोची, लक्षद्वीप या मार्गांवर ही क्रुझ सेवा उपलब्ध असणार आहे. यात 14 मजली क्रूझमधून पर्यटकांना पंचतारांकित सुविधायुक्त प्रवास अनुभवता येणार आहे.

2 ते 5 दिवसांसाठी ही क्रूझ सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या 14 मजली क्रूझमध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणेच सुविधा असतील. दोन दिवसांच्या क्रूझ प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे 27,000 रुपये मोजावे लागतील.

Goa Cruise Service
Goa Tree Census: गोवा सरकारला हे काम जमणार का? मुदत संपत आली; 3.9 कोटी वृक्षणगणनेचे आव्हान

आतापर्यंत देशात केवळ लहान क्रूझ चालायच्या. परंतु यावर्षी नोव्हेंबरपासून 14 मजली पंचतारांकित लक्झरी क्रूझ पर्यटकांना समुद्र सफारीचा उत्तम अनुभव देणार आहे. 4 नोव्हेंबरपासून मुंबई, गोवा, कोची, लक्षद्वीप या मार्गांवर ही सेवा उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत ही घोषणा करण्यात आली.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे (बीपीटी) चेअरमन राजीव जलोटा म्हणाले की, कोस्टा क्रूझ कंपनीने देशात प्रथमच लक्झरी क्रूझ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी अनेक कंपन्यांनी देशात क्रूझ सेवा चालविण्यात स्वारस्य दाखवले आहे. देशांतर्गत जलमार्गांवर लक्झरी क्रूझ चालवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.

क्रुझची वैशिष्ट्ये

  • प्रवाशांसाठी 2 ते 5 दिवस क्रूझ सेवा उपलब्ध असेल.

  • 14 मजली क्रूझमध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुविधा

  • दोन दिवसांच्या क्रूझ प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे 27,000 हजार रुपये मोजावे लागतील.

  • पाच दिवसांसाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च करावे लागतील.

  • 1,14,000 टन वजनाच्या कोस्टा सेरेना क्रूझमध्ये 3,780 लोकांसाठी राहण्याची सोय आहे.

  • 1500 केबिन असलेल्या क्रूझमध्ये 505 बाल्कनी, जिम, स्पा, 4 स्विमिंग पूल असतील.

Goa Cruise Service
Goa Monsoon: चिंताजनक! गोव्यात जूनमध्ये केवळ 6.8 इंच पाऊस

कोस्टा क्रूझच्या भारतातील प्रमुख नलिनी गुप्ता म्हणाल्या की, आतापर्यंत पर्यटकांना देशाच्या इतर भागातून मुंबई किंवा मालदीवमध्ये जावे लागायचे. केवळ क्रूझपर्यंत पोहोचण्यासाठीच हजारो रूपये खर्च व्हायचे.

तसेच पासपोर्ट आणि व्हिसाची व्यवस्थाही करावी लागत होती. मात्र आता या त्रासातून सुटका होणार आहे. विशाखापट्टणम, पोरबंदर आणि अंदमान निकोबार येथूनही ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com