Vidyabhuvan Dainik Gomantak
गोवा

International Yoga Day 2023 : दामोदर विद्याभुवनाला व्यासनी मिळवून दिला ‘गौरव’

शेकडो विद्यार्थी, युवक, त्यांचे पालक विविध उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी विद्याभुवनमध्ये येतात.

गोमन्तक डिजिटल टीम

मंगेश बोरकर

कोंब-मडगाव येथील श्री दामोदर विद्याभुवन या सामाजिक, सांस्कृतिक, नाटक, संगीतकेंद्राला 100 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. सध्‍या या केंद्राचा ताबा दामोदर विद्याप्रसारक मंडळाकडे आहे. गेल्या 20-25 वर्षांपासून प्रसारक मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. नृत्य, तबला, हार्मोनियम, योग, बुद्धिबळ प्रशिक्षण सुरू आहे.

योगशिक्षक गौरव व्यास यांनी 2014 पासून मंडळाचे नृत्यशिक्षक म्हणून प्रवेश केला आणि दामोदर विद्याभुवनची प्रतिमाच उजळून निघाली. आता दररोज शेकडो विद्यार्थी, युवक, त्यांचे पालक विविध उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी विद्याभुवनमध्ये  येतात.

गौरव व्यास हे भरतनाट्यम्‌चे शिक्षक असले तरी त्यांनी योगशिक्षण देण्याचेही काम सुरू केले आहे. यासंदर्भात बोलताना व्यास यांनी सांगितले की, नृत्‍य शिकताना किंवा शिकताना योगाचा उपयोग होतच असतो. त्यामुळे आपण 2013 साली सांताक्रुझ-मुंबई येथील योग इन्स्टिट्यूटमधून योगशिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. त्‍याचा आपल्याला बराच फायदा झाला.

गौरव व्‍यास यांच्‍या कार्याबद्दल प्रतिक्रिया

अन्न, वस्र, निवारा या मानवाच्‍या मूलभूत गरजांबरोबरच जीवन जगण्यासाठी योगाचीही आवश्यकता आहे हे आपण योगशिक्षक गौरव व्यास यांच्याकडून शिकले. योगाद्वारे आपले जीवन अधिक समृद्ध केल्याबद्दल व्यास यांचे मी सदैव आभारी आहे.

वीणा काकोडकर

मला सतत चिंता, भीती सतावत असे. डॉक्टरांनी मला चालण्याचा, योग व ध्यान करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी विद्याभुवनात गौरव व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली योग व ध्यान सुरू केले. केवळ एका वर्षात त्याचा मला चांगला फायदा झाला.

श्‍‍वेता नायक दलाल

गौरव व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली योग करताना मला अनेक चांगले अनुभव आले. व्यास हे सदैव प्रेरणा, प्रोत्साहन देणारे शिक्षक आहेत. मी पन्नाशी उलटल्यानंतर योगासने करायला सुरूवात केली. त्‍याचा मला खूप फायदा झाला.

उदय आमोणकर

योगामुळे माझ्या जीवनातील लवचिकता वाढली. योगा केल्‍याने मन शांत होते. ध्यानामुळे माझी एकाग्रता वाढली.

राजीव देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT