International Tiger Day Dainik Gomantak
गोवा

International Tiger Day : गोव्यातील 7 वाघांच्या अस्तित्वावर उमटणार मोहोर

पर्यावरणप्रेमींत उत्सुकता : पंतप्रधान आज करणार राज्यनिहाय व्याघ्रगणनेची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

International Tiger Day : एका बाजूने राज्य सरकार वाघ हे गोव्याचे फक्त पाहुणे, रहिवाशी नाहीत, अशी भूमिका मांडत असले तरी वन खात्याच्या पाहणी नुसार गोव्यात किमान सात वाघांचा वावर दिसून आला आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या (२९ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात राज्यनिहाय व्याघ्रगणनेची घोषणा करणार असून त्यावेळी गोव्यातील वाघांच्या या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होईल का? याची उत्सुकता पर्यावरणप्रेमींत आहे.

सत्तरी भागातील सुर्ला आणि साट्रे या जंगल भागात चार वाघांचा वावर दिसत असून मोले अभयारण्याच्या वरच्या करंझोळ डोंगरावर तीन वाघ वावरताना दिसतात.

याशिवाय नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातही अधून मधून पट्टेरी वाघ दिसून आले आहेत. वन खात्याच्या कॅमेऱ्यात या वाघांची छायाचित्रे कैद झाली आहेत.

वाघुर्मे आणि वाघुरे

गोव्यात काही गावांची नावे सुद्धा वाघाच्या अस्तित्वाशी जुळलेली असून फोंडा तालुक्यातील वाघुर्मे (सावईवेरे) आणि सत्तरीच्या वाघूरे या गावांचा समावेश आहे.

याशिवाय सत्तरी तालुक्यात असलेला वाघेरी डोंगर, पाळी येथील वाघबिळ, साट्रे येथील वाघाची होवरी, श्रीस्थळ काणकोण येथील वाघाहन्न (गुहा) खोतीगाव येथील वाघा डोंगर या जागाही वाघांशी संबंधित आहेत.

गोवा आणि वाघ

गोव्यात वाघांचे अस्तित्व फार पूर्वीपासून असून गोव्यात वाघांची शंभरपेक्षा अधिक देवळे असून धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण या तालुक्यात त्यांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती राजेंद्र केरकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT