Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

'आपल्‍या मुलीला चांगले शिक्षण देणे, तिला घडवणे हे प्रत्‍येक पालकाचे कर्तव्‍य', मंत्री विश्वजित राणेंचे प्रतिपादन

Vishwajit Rane: आजच्‍या आधुनिक जगातही काही कुटुंबे मुलगी आणि मुलगा यांच्‍यामध्‍ये फरक करतात. मुलगीपेक्षा मुलगा श्रेष्‍ठ अशी त्‍यांची मानसिकता असते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आज महिला प्रत्‍येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्‍यामुळे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता मुलींना चांगले शिक्षण देणे, त्‍यांना त्‍यांच्‍या आवडत्‍या क्षेत्रात करियर करू देणे हे पालकांचे आद्य कर्तव्‍य आहे, असे महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

महिला आणि बाल कल्‍याण खात्‍यामार्फत आंतरराष्‍ट्रीय बालिका दिनानिमित्त शनिवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खात्‍याचे सचिव अरुण मिश्रा, संचालक ज्‍योती देसाई, गोमेकॉचे अधीक्षक डॉ. राजेश पाटील आदी यावेळी उपस्‍थित होते.

आजच्‍या आधुनिक जगातही काही कुटुंबे मुलगी आणि मुलगा यांच्‍यामध्‍ये फरक करतात. मुलगीपेक्षा मुलगा श्रेष्‍ठ अशी त्‍यांची मानसिकता असते. परंतु, ही मानसिकता पूर्णपणे चुकीची आहे. आज विविध क्षेत्रांमध्‍ये महिला आघाडीवर आहेत. यशाची अनेक शिखरे त्‍या पादाक्रांत करीत आहेत. त्‍यामुळे आपल्‍या मुलीला चांगले शिक्षण देणे, तिला घडवणे आणि तिच्‍या आवडत्‍या क्षेत्रात करिअर करू देणे, हे प्रत्‍येक पालकाचे कर्तव्‍य आहे, असे मंत्री राणे म्‍हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील केंद्र सरकारने नेहमीच महिला सक्षमीकरणाला प्राधान्‍य दिले आहे. देशभरातील मुलींसमोर येणाऱ्या अडचणी, संकटे दूर करण्‍याचा प्रयत्‍न मोदी सरकार करीत आहे. त्‍यामुळेच अनेक महिला आपापल्‍या क्षेत्रात नाव मिळवत आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

स्‍वत:चा किस्सा...

बिहारमधील ऑटो रिक्षा चालकाची मुलगी असलेल्‍या पायल कुमारीला ‘आयएएस’ बनायचे आहे. परंतु, घरच्‍या बिकट आर्थिक स्‍थितीमुळे तिला शिक्षण घेण्‍यास त्रास होत असल्‍याची बातमी आपण काही वर्षांपूर्वी टीव्‍हीवर पाहिली. त्‍यानंतर आपण पायल कुमारीशी फोनद्वारे संपर्क साधला. पुढील शिक्षण घेण्‍यास तिला मानसिक धीर देत माझ्‍यापरीने जितकी आर्थिक मदत देता येईल तितकी मी तिला देत आहे. आपले ‘आयएएस’ बनण्‍याचे ध्‍येय तिने पूर्ण करावे, हीच आपली इच्‍छा असल्‍याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

SCROLL FOR NEXT