Goa Environment: आम्हाला निसर्गाने निर्माण केले आहे. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; परंतु माणसाची हाव नाही. निसर्ग सर्व जीवांसाठी आहे; परंतु मानवाचा हव्यास अधिक आहे. मानव तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक गोष्टी निर्माण करू शकतो; परंतु निसर्ग निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी केले.
गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि शाश्वतता परिषदेत प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्लोबल बॅंकिंगचे व्यवस्थापकीय संचालक दिबिरत सेन, एसईबीआयचे अमरजित सिंग व एसबीआयचे रोहित शिंपी उपस्थित होते.
आमच्यासमोरील स्थिती आव्हानात्मक आहे. समुद्री जैवविविधता धोक्यात आहे. तापमानात वाढ होत राहिल्यास जैवविविधता नष्ट होईल. भारतात हिमालय आणि पश्चिम घाट जेथे आज परिषद होत आहे, ही भारतातील जैवविविधतेची दोन केंद्रे असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
संसाधने जपून वापरा
आहे त्या संसाधनांत समाधानी राहा, या आमच्या पूर्वजांनी दिलेल्या सल्ल्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. आम्हाला आमची उपलब्ध संसाधने मर्यादित स्वरूपात वापरावी लागतील आणि तंत्रज्ञान पर्यावरण संवर्धनावर उपाय सुचवेल.
आमच्यासमोरील स्थिती आव्हानात्मक आहे. जैवविविधता वाचविण्यासाठी युवा पिढीलादेखील कार्य करावे लागेल, असे प्रभू यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.