Goa Cricket Stadium Dainik Gomantak
गोवा

Goa Cicket: म्हावळींगे की धारगळ? असोसिएशनच्या आमसभेत 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम' ठरणार कळीचा मुद्दा?

Goa Cicket Association: धारगळ येथे स्टेडियम उभारणीसंदर्भात काहीच महत्त्वपूर्ण हालचाल झालेली नाही. डिचोली तालुक्यातील मावळींगे येथे जीसीए मालकीच्या जागेत भव्य स्टेडियम उभे राहावे असे काही क्लबना वाटते.

गोमन्तक डिजिटल टीम

GOA GCA Cricket Stadium Location

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) आगामी आमसभेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कळीचा मुद्दा ठरण्याचे संकेत आहेत. आमसभा २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आल्त-पर्वरी येथील जीसीए संकुलात होईल, त्यावेळी डिचोलीतील म्हावळींगे, की पेडण्यातील धारगळ येथे स्टेडियम बांधकाम करावे याविषयी सविस्तर चर्चा शक्य असेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रलंबित असलेला स्टेडियमचा प्रश्न आमसभेत काही क्लब उपस्थित करू शकतात. या प्रकरणी नेमकी स्पष्टता सर्व क्लबना जीसीए पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित असेल. गतवर्षीच्या आमसभेत धारगळ येथे स्टेडियम बांधकामाचा ठराव घेण्यात आला होता. म्हावळींगे येथील नियोजित क्रिकेट स्टेडियमची जागा त्यापूर्वीच सुमारे चाळीस कोटी रुपये खर्चून जीसीएने खरेदी केली होती.

त्यानंतर धारगळ येथील जागा राज्य सरकारकडून भाडेपट्टीवर मिळाली. साहजिकच स्टेडियम कुठे होणार याबाबत जीसीए संलग्न क्लब संभ्रमित आहेत. त्यांना सविस्तर माहिती देऊन स्टेडियमचे महत्त्व जीसीएच्या पदाधिकाऱ्यांना पटवून द्यावे लागेल. गोव्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधणीचा प्रश्न मागे राज्य विधानसभेतही चर्चेस आला होता. स्टेडियम प्रकरणी जीसीए आमसभेत संलग्न क्लबांची भूमिका निर्णायक ठरेल.

‘बीसीसीआय’ अनुकूल

गेल्यावर्षी २५ सप्टेंबरला गोव्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक आमसभा झाली होती. त्यावेळी रोहन गावस देसाई यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी व सचिव जय शाह यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमप्रश्नी लक्ष वेधले होते. क्रिकेट स्टेडियमसाठी जीसीएला बीसीसीआय पूर्ण सहकार्य करेल. जीसीए पदाधिकाऱ्यांनी याबाबत बीसीसीआयकडे सातत्याने पाठपुरावा करावा, त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल, असे मत संबंधित बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी तेव्हा व्यक्त केले होते. आता रविवारी बंगळूर येथे झालेल्या यावेळच्या बीसीसीआय आमसभेच्या कालावधीत रोहन गावस देसाई यांनी जय शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील क्रिकेटविषयक सविस्तर चर्चा केली. त्यावेळीही गोव्यातील क्रिकेटला बीसीसीआयचा प्राधानक्रम राहील, अशी ग्वाही जय शहा यांनी दिली. गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी बीसीसीआय अनुकूल असल्याचे यावरून स्पष्ट होते.

गतवर्षी धारगळसाठी ठराव

पूर्वीच्या व्यवस्थापकीय समितीने धारगळ क्रिकेट स्टेडियमसंदर्भात कागदोपत्री बाबींचा पाठपुरावा केला. जवळपास सर्व आवश्यक मान्यता प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती गतवर्षीच्या आमसभेत देण्यात आली होती, त्यामुळे त्याठिकाणीच नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरचे लवकरात लवकर बांधकाम सुरू करावे असा ठराव एकमताने मंजूर केला होता, परंतु अजून धारगळ येथे स्टेडियम उभारणीसंदर्भात काहीच महत्त्वपूर्ण हालचाल झालेली नाही. नियोजित क्रिकेट स्टेडियम संदर्भात राज्यातील क्रिकेटमध्ये आणखी एक मतप्रवाह आहे. त्यानुसार धारगळची जागा जीसीएला राज्य सरकारकडून भाडेपट्टीवर मिळालेली आहे. या कारणास्तव डिचोली तालुक्यातील मावळींगे येथे जीसीए मालकीच्या जागेत भव्य स्टेडियम उभे राहावे, असे काही क्लबना वाटते. राज्य सरकारही जीसीए मालकीच्या जागेत स्टेडियमवर बांधकामस अनुकूल आहे. गतवर्षी जीसीएच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात तसे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूचीत केले होते. राज्य सरकारच्या सहकार्याने नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे काम लवकर पूर्ण करण्याकडे जीसीएचा कल आहे. साहजिकच २० ऑक्टोबरला होणाऱ्या आमसभेत स्टेडियमप्रकरणी ठोस निर्णय अपेक्षित असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT