ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Goa ED Raid: युको बँकेकडे बनावट दागिने तारण ठेवून तब्बल २.६३ कोटी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकरण उघडकीस आले.
Goa ED Raid
Goa ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: युको बँकेकडे बनावट दागिने तारण ठेवून तब्बल २.६३ कोटी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकरण उघडकीस आले असून, सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) पहाटेपासून छापासत्र सुरू केले आहे. या कारवाईत कोलवा येथील हेमंत रायकर आणि सां जुझे द आरियल-मुगाळी येथील गुंडू यल्लपा केलवेकर यांच्या निवासस्थानांची तपासणी केली आहे.

युको बँकेचे सरव्यवस्थापक ज्ञानंद शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रायकर हा बँकेतील सोनार म्हणून कार्यरत होता. दागिन्यांचे मूल्यांकन करणे ही त्याची जबाबदारी होती. मात्र, त्याने केलवेकर याच्याशी संगनमत साधून जुलै २०१९ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव शाखेतून बनावट दागिने तारण ठेवले.

या योजनेतून विविध व्यक्तींच्या नावाने २,६३,०७,२८० कर्ज काढण्यात आले आणि रायकरने बनावट दागिन्यांना खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले, असा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे.

Goa ED Raid
Goa Education: 'पंचज्ञान इंद्रिय मॉडेल'साठी गोवा सरकार प्रयत्नशील; CM सावंत म्हणाले, 'विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिक्षणाची गरज'

कोठे व कधी झाल्‍या कारवाया?

२ सप्टेंबर रोजी ‘ईडी’ने कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र उर्फ ‘पप्पी’ यांच्या आस्थापनांवर छापे टाकले होते. या कारवाईत तब्बल ५५ कोटी रुपये असलेले बँक व डिमॅट खाते गोठवण्यात आले. सहा महागड्या कार, ज्यात मर्सिडीज-बेंझचाही समावेश आहे, त्या जप्त करण्यात आल्या.

याआधीही वीरेंद्र यांना ऑगस्टमध्ये अटक झाली होती. त्यांच्याकडून १२ कोटींची रोकड, सोने-चांदी व मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या. तपासात असे स्पष्ट झाले आहे की, अवैध ऑनलाईन बेटिंग साइट्समार्फत २ हजार कोटींहून अधिक रक्कम फिरवली होती. गोव्यातील त्यांच्या पाच कॅसिनोंवरही छापे टाकले आहेत.

पर्यटनाव्‍यतिरिक्‍त ड्रग्‍ससाठी अधून-मधून चर्चेत येणारा गोवा ‘मनी लाँड्रिंग’साठी चर्चेत आला आहे. बाहेरील राज्‍यांमधील काळा पैसा पांढरा करण्‍यासाठी गोव्‍यातील संसाधनांचा वापर करण्‍याचे प्रमाण वाढले असून, सक्‍त वसुली संचालनालयाने १५ दिवसांत किमान ५ छापे टाकून सुमारे १०० कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

एकेकाळी पर्यटनासाठी चर्चेत असलेला गोवा आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मागील दोन आठवड्यांत राज्यात सलग छापे टाकल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे.

Goa ED Raid
Goa Politics: भाजपचा पराभव करण्यासाठी एकीची गरज, काँग्रेसमध्ये त्याचाच अभाव; विजय सरदेसाईं

मनी लॉन्ड्रिंग, बँक फसवणूक, अवैध बेटिंग आणि अमली पदार्थ प्रकरणांवर कारवाई करताना ईडीने राज्यातील आणि राज्याबाहेरील वजनदार व्यक्ती व कंपन्यांवर छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड, अलिशान गाड्या, सोने–चांदी यांसह अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.

बनावट संचालकांच्या नावाने व्यवहार

वेगवेगळ्या प्रकरणांत चेन्नई झोनल ऑफिसमार्फत २-३ सप्टेंबर रोजी गोवा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. ही कारवाई अरविंद रेमेडीज लिमिटेड या कंपनीवर ६३७ कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान १५ लाख शेअर्स गोठवले गेले, तसेच महत्त्वाचे डिजिटल पुरावे देखील ईडीच्या हाती लागले. तपासात कंपनीने शेल कंपन्यांमार्फत निधी वळवून बनावट संचालकांच्या नावाने व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.

डिजिटल साधने जप्त

पणजी विभागीय कार्यालयाने २८ ऑगस्ट रोजी क्राऊन मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीची २.८६ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या कंपनीविरुद्ध ७ कोटींच्या बँक फसवणुकीचा आरोप आहे. याशिवाय १९ ऑगस्ट रोजी अमली पदार्थ प्रकरणात घेतलेल्या शोध मोहिमेत डिजिटल साधने जप्त करण्यात आली तसेच काही बँक खाती देखील गोठवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com