Ravindra Bhavan Dainik Gomantak
गोवा

Margao News : मडगावात आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव ; रवींद्र भवनमधील कॅंटीन ४ वर्षांनंतर लोकांच्या सेवेत

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : सासष्टी, आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव मडगावात भरणार आहे. सरकारने त्यासाठी संमती दिली आहे. तसेच येथील रवींद्र भवनात भविष्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

तसेच आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील काही सिनेमे इथे दाखवले जातील, असेही कामत यांनी सांगितले. जवळपास चार वर्षांनंतर रवींद्र भवनमधील कॅंटीन बुधवारपासून खुले झाले. त्याचे उद्‍घाटन केल्यावर कामत बोलत होते.

सोमवारपासून हे कॅंटीन पूर्ण क्षमतेने सुरु होईल, असे माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले. केंद्र सरकार सध्या भरड धान्य वर्ष साजरे करीत आहे. त्या अनुषंगाने कॅंटीन चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने पौष्टिक खाद्यपदार्थ उपलब्ध करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

आपण अध्यक्षपदाचा ताबा घेतल्या बरोबर कॅंटीन सुरु करण्याच्या कामाला प्राधान्य दिले. मात्र अनेक अडचणी व सरकारी दाखले घ्यायचे असल्याने थोडा उशीर झाला, असे रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सांगितले.

रवींद्र भवनमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जाईल. मुलांना खेळण्या बागडण्यासाठी खास जागा तयार केली जाईल, असेही तालक यांनी सांगितले.

रवींद्र भवनचे सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस यांनी स्वागत केले. अधिकारी पुनम बुधोलकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष मनोहर बोरकर, इतर सदस्य, नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्थांना संधी

सरकारी कचेऱ्या तसेच रवींद्र भवनसारख्या संस्थांमध्ये कॅटीन चालविण्यास केवळ स्वयंसेवी संस्थांना देण्याचे धोरण सरकारने आखले आहे

. मडगावातील रवींद्र भवनमधून त्याची सुरवात झाल्याचे कामत यांनी सांगितले. रवींद्र भवनचे कॅंटीन अष्टविनायक या मडगावातील महिला स्वसंसेवी गटाला देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT